Devendra Fadnavis New CM of Maharashtra Oath Taking Ceremony : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी महायुतील बहुमत दिल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा सुरू होत्या . यानंतर आज (४ डिसेंबर) राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आता उद्या (५ डिसेंबर) रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

भाजपाच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा ठराव आज मंजूर करण्यात आला. यानंतर फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार यावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर झाल्यानंतर फडणवीसांनी तीन वेळा मुख्यमंत्री पदावर बसवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. ७२ तासच का असेना पण तांत्रिकदृष्ट्या मी मुख्यमंत्री होतो असे फडणवीस म्हणाले आहेत.

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
Shinde Fadnavis move by transferring Gadchiroli District Collector Gadchiroli news
गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून शिंदेना फडणवीसांचा शह?
Shambhuraj Desai, tourism Maharashtra ,
महाराष्ट्राला पर्यटनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य बनवू, पर्यटनमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही
devendra fadnavis gadchiroli guardian minister
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना हवंय ‘या’ जिल्ह्याचं पालकमंत्रीपद; मित्रपक्षांनी सहमती दिल्यास जबाबदारी स्वीकारणार!
prashant bhushan on gst nirmala sitharaman
Nirmala Sitharaman: “निर्मला सीतारमण जीनियस आहेत, १ लाखाच्या कारवर…”, प्रशांत भूषण यांनी GST चं मांडलं गणित!

विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक बहुमताविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, “२०१९ सालीदेखील जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता. दुर्दैवाने जनतेचा कौल हिसकावून घेण्यात आला आणि त्या कळात जनतेबरोबर बेईमानी झाली. मी इतिहासात जाऊ इच्छित नाही, आपण नवी सुरूवात करतोय, पण या गोष्टीचा नक्की उल्लेख करेन की, पहिल्या अडीच वर्षात वेगवेगळ्या पद्धतीने नेत्यांना, आमदारांना त्रास देण्यात आला, अशाही परिस्थितीत अडीच वर्षात एकही आमदार किंवा नेता आपल्याला सोडून गेला नाही. या काळात सर्व नेते संघर्ष करत होते. त्या संघर्षामुळेच २०२२ साली पुन्हा आपलं सरकार तयार झालं आणि त्यातूनच महायुतीला पूर्ण बहुमत मिळालं”.

हेही वाचा>> मुख्यमंत्रि‍पदाचा मार्ग मोकळा होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एक है तो सेफ है…”

मोदींनी सर्वोच्च सर्वोच्च पदावर तीन वेळा बसवलं…

देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची फडणवीसांची ही तिसरी वळ असणार आहे. २०१९ मध्ये अवघ्या ७२ तासांसाठी देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री बनले होते. याचा उल्लेख उल्लेख करत फडणवीस यांनी पंतप्रधान मोंदींचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान मोदी यांचे मनापासून आभार मानतो, माझ्यासारख्या बूथचा कार्यकर्ता म्हणून ज्याने काम चालू केलं, अशा एका कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर तीन वेळा मोदींनी बसवलं. अर्थात, एकदा ७२ तासांसाठीच होतो. पण तरीही तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री होतो. त्यामुळे तीन वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसण्याचा मान मोदींनी दिला. हा पक्ष त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला. त्यातूनच सामान्य कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदं मिळाली, काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी मोदींचे आभार मानतो. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही आभार मानतो”, असेही मोदी म्हणाले.

Story img Loader