Vidhan Sabha Election 2024: विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. प्रचार सभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांने राजकारण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर हल्लाबोल केला. “सुन लो ओवैसी, हे छत्रपती संभाजीनगर आहे, औरंगाबाद नाही”, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमला दिला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज आपण एकत्र आलेलो आहोत. सुन लो ओवैसी हे छत्रपती संभाजीनगर आहे. आता कुणाचा बापही आला तरी छत्रपती संभाजीनगर हे नाव बदलू शकत नाही. काल एमआयएमची या ठिकाणी सभा झाली. त्या सभेमध्ये एक महिला म्हणाली की, छत्रपती संभाजीनगर नाव कसं झालं? त्यांना हे माहिती नाही की, छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा आणि महापराक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज होते. ज्या छत्रपती संभाजी महाराजांना पडकण्यासाठी औरंगजेब संभाजीनगरमध्ये येऊन बसला. मात्र, ९ वर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला झुलवत ठेवलं. एकही लढाई छत्रपती संभाजी महाराज हरले नाहीत. मात्र, फितुरी झाली नसती तर आमचे छत्रपती संभाजी महाराज कधीच औरंगजेबाच्या हातात आले नसते”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
Sharad Pawar On Dhananjay Munde
Sharad Pawar : “राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांमध्ये तीन लोक प्रामुख्याने होते”, शरद पवारांचा रोख कुणाकडे? चर्चांना उधाण
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana
Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

हेही वाचा : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ

“औरंगजेबाचं नाव या शहराला कधीच राहू नये, म्हणून आपल्या महायुतीच्या सरकारने या शहराला छत्रपती संभाजीनगर हे नाव दिलं आहे. पण ज्यांचे मनसुबे रझाकारांचे राज्य आणण्याचे आहे. त्यांना मी सांगतो की आम्ही जागे झालो आहोत. ही निवडणूक एकजूट दाखवण्याची आहे. आपण धर्मयुद्ध करू. देव, देश आणि धर्म काय आहे? हे संभाजीनगरकरांनी दाखवून द्यायला हवं”, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

“आता या ठिकाणी ‘व्होट जिहाद’ सुरु झालेला आहे. आपण सर्वांनी पाहिलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाच लोकसभा मतदारसंघात एक लाख ९० हजार मतांनी आपण पुढे होतो. मात्र, फक्त चार हजार मतांनी आपले उमेदवार पराभूत झाले. लोकसभेच्या निवडणुकीत व्होट जिहाद हे आपल्या अनेक मतदारसंघात पराभवाचं कारण राहिलं. काही लोकांनी भगव्या बद्दल गद्दारी केली. काही लोकांनी मतांची लाचारी केली”, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.