Devendra Fadnavis : विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागलेलं आहे. काही दिवसांपासून सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचारासाठी दिल्लीतील दिग्गज नेत्यांनीही विविध मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या. आज (१८ नोव्हेंबर) निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज्यभर अनेक नेत्यांच्या सभा पार पडल्या. आज सांयकाळी ६ वाजल्यानंतर प्रचाराच्या थोफा थंडवणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज आर्वीमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसवाले निवडणुकीपुरतं आश्वासन देतात आणि निवडणुकीनंतर त्यांची आश्वासनं संपून जातात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“विधानसभेच्या निवडणुकीची शेवटची प्रचारसभा घेण्यासाठी मी आर्वीमध्ये आलो. २३ तारखेला निकाल आल्यानंतर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. लोकांना माहिती आहे की काम करणारे कोण आहेत? आपण नमो किसान योजना आणली. आता पुन्हा तुमचा आशीर्वाद मिळाला तर १२ हजार नाही तर १५ हजार या योजनेच्या माध्यमातून आपण देणार आहोत. तसेच हमी भावापेक्षा जेव्हा जेव्हा कमी भाव शेतकऱ्यांना मिळेल तेव्हा दोन्ही मधला फरक आपलं सरकार देईन”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : “जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय”, प्रतिभा पवारांच्या हातातील फलकाने वेधलं बारामतीकराचं लक्ष

“राज्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी काल परवा राहुल गांधी आले होते. त्यांनी म्हटलं की त्यांचं सरकार आलं तर सात हजार रुपये देऊ. त्यानंतर मी थेट मल्लिकार्जुन खर्गे यांच्या गावात फोन केला आणि विचारलं तुमच्याकडे सोयाबीनचा दर काय? तेव्हा मला माहिती मिळाली की ३८०० रुपये आहे. त्यामुळे लक्षात ठेवा लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नसतं. हे काँग्रेसचे लोक खोटे आहेत. निवडणुकीपुरतं आश्वासन देतात आणि निवडणुकीनंतर त्यांची आश्वासनं संपून जातात. मात्र, जनतेचा विश्वास आमच्या पाठिशी आहे”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

“लाडक्या बहिणींनो मला तुम्हाला सांगायचं आहे की जसं आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, तसं महाविकास आघाडीवाले तुमचे सावत्र भाऊ देखील बाहेर फिरत आहेत. काँग्रेसवाले सावत्र भाऊ आणि तुतारीवाले सावत्र भाऊ हे कोर्टात गेले. पण कोर्टाने सांगितलं की ही योजना बंद होणार नाही. त्यानंतर या सावत्र भावांचं तोंड बारीक झालं. आता तुम्हाला जनसामान्यांचे नेते पाहिजेत की घराणेशाहीचे नेते हवे आहेत? हे आता तुम्हाला ठरवायचं आहे”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.