Devendra Fadnavis on Daughter Divija Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी (१० जानेवारी) विदर्भाच्या दौऱ्यावर होते. यावेळी नागपूरमध्ये जिव्हाळा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध राजकीय प्रश्नांवर अगदी रोखठोक उत्तरं दिलं. यावेळी त्यांनी त्यांच्या लेकीचंही कौतुक केलं. तसंच, फडणवीसांच्या कुटुंबात राजकारणातला मीच शेवटचा असेन असंही त्यांनी म्हटलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, खरंतर मी नेहमी गंमतीने असं म्हणतो की आमच्या घरात सर्वांत प्रज्ज्वल दिविजा आहे. करण तिचं वय १५ आहे. पण तिच्यात खूप प्रगल्भता आहे. आता निवडणुकीच्या काळात तिलाही अनेक माध्यमांनी प्रश्न विचारले. अशावेळी अनेकदा क्रूर प्रश्न विचारले जातात. अडचणीत येणारे प्रश्न विचारले जातात. तिला प्रश्न विचारला की तुझे वडील मुख्यमंत्री होतील का? त्यावर ती म्हणाली की ‘जो होईल तो महायुतीचा होईल. नेते ठरवतील तो मुख्यमंत्री होईल.’ त्यामुळे तिच्यात जी प्रगल्भता आहे, त्यानुसार तिला अंतर समजतं. तिला माहितेय की राजकारणात अशाप्रकारे टार्गेट केलं जातं, अद्वातद्वा बललं जातं. मी, आई किंवा अमृताने तिला काही शिकवलं नाही. ती तिचंच शिकली आहे”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या लेकीचं कौतुक केलं.

वडिलांकडून झालेल्या कौतुकामुळे दिविजा आता फडणवीसांच्या घरातील आता राजकारणात येणारी पुढचं नेतृत्त्व असेल असा विश्वास मुलाखतकाराने व्यक्त केला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “तिला राजकारणात यायचं असेल तर तिने जरूर यावं. पण फडणवीसांच्या कुटुंबात राजकारणातला शेवट मी आहे.”

हेही वाचा >> Devendra Fadnavis : कठोर राजकारणी कोण मोदी की अमित शाह? देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं?

राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला सांगितलं तर व्हाल का?

अनुशासन पाळायचं म्हणून जर पक्षाने तुम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला सांगितलं तर व्हाल का? की मुख्यमंत्रीच राहायला आवडेल? या प्रश्नाचं उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी सूचक उत्तर दिलं. ते म्हणाले, “पक्ष जे सांगेल ते करायचं. माझं नेहमी एक म्हणणं असतं की मी मोठा झालो म्हणजे ही माझी क्षमता होती म्हणून नाही, तर माझ्या पाठीशी पक्ष उभा होता म्हणून. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षात अनेक नेते होते. मग त्यामध्ये कदाचित माझ्यापेक्षाही चांगले असतील. त्यावेळी त्यांना संधी नाही मिळाली मला संधी मिळाली, पक्षाने दिली. त्यामुळे माझं ठाम मत आहे की जर माझ्या पाठिमागचा भारतीय जनता पक्ष जर काढला तर मला जास्त कोणी विचारणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis on daughter divija fadnavis over her smart answers on politics sgk