अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला ससून रूग्णालयातून पसार होण्यासाठी पोलिसांनीच मदत केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर पोलीस प्रशासनाची नाचक्की झाली होती. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यानही या विषयावर चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनीदेखील हा मुद्दा विधानसभेत मांडला. त्यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. फडणवीस म्हणाले, गृह विभागाने अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. यासाठी अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. याद्वारे आपण राज्यात ५०,००० कोटी रुपयांचे अमली पदार्थ पकडले आहेत.

उपमुख्यमंत्री म्हणाले, वेगवेगळ्या महाविद्यालयांच्या बाहेर असलेल्या पानटपऱ्यांवर अमली पदार्थ विकले जातात. त्यामुळे अशा २,२०० टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच बंद कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्सपासून ड्रग्स बनवले जात असल्याची माहिती मिळाल्यावर तिथेही धाडी टाकण्यात आल्या. पूर्वी आपण कढईत गुळ तयार करायचो तसे आता अमली पदार्थ बनवले जात आहेत.

Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
319 crores received for birth certificates of Bangladeshis and Rohingye says kirit somaiya
“बांगलादेशी, रोहिंग्यांच्या जन्म दाखल्यासाठी ३१९ कोटी आले”… किरीट सोमय्यांनी थेट…
devendr fadnavis sanjay raut
“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Sudhir Mungantiwar absent chandrapur Chief minister Devendra Fadnavis program
निमंत्रण पत्रिकेमध्ये शेवटी नाव…. अपमान झाल्याने मुनगंटीवारांनी फडणवीसांच्या…..

फडणवीस यांनी ललित पाटील याच्या दाव्यावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ललित पाटील एक गुन्हेगार आहे. त्याची विश्वासार्हता काय? तसेच त्याला ज्यांनी मदत केली अशा चार पोलिसांना कलम ३११ अंतर्गत सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. अमली पदार्थांशी संबंधित थेट सहभाग असलेल्या पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. अशा १० पोलिसांना बडतर्फ करण्यात आलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलीस आता केवळ अमली पदार्थ खरेदी करणारे आणि विकणाऱ्यांवरच कारवाई करत नाहीत, तर विक्रेत्यांची साखळी शोधून संपूर्ण रॅकेटवर कारवाई करत आहेत. तसेच यांच्यावर अधिक कडक कारवाई करण्यासाठी विशेष कायदा करण्याचा प्रयत्न केला जाईल.

हे ही वाचा >> अमित शाहांबरोबरची बैठक ऐन वेळी पुढे ढकलली; कारण सांगताना अजित पवार म्हणाले, “रात्री आम्हाला…”

राज्यातल्या अमली पदार्थांच्या तस्करीबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांनी सांगितलं की, समाजमाध्यमांद्वारे जसे की इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अमली पदार्थाची तस्करी केली जात आहे. तसेच गुगल पेसारख्या यूपीआय पेमेंट अ‍ॅपद्वारे पैसे देणं आणि कुरीअर एजन्सींच्या माध्यमातून अमली पदार्थांची डिलीव्हरी करणं असे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे आम्ही कुरीअर एजन्सींना एक नियमावली पाठवली आहे. तसेच त्यांच्याकडे असं कुठलंही पॅकेज सापडलं तर सर्वस्वी जबाबदारी त्यांची असेल, असंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कुरीअर एजन्सींना त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पॅकेजची पडताळणी करून पाहावी लागेल.

Story img Loader