काही दिवसांपूर्वी एका जाहिरातीमुळे शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये वादाची ठिणगी पडली होती. शिंदे गटाने राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर एक जाहिरात दिली होती. ज्यामध्ये “राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे” अशा प्रकारचा संदेश दिला होती. एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत, असा संदेशही एका सर्वेक्षणाच्या आधारे दिला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात प्रतिक्रिया देण्यात आल्या. मात्र, दुसऱ्याच दिवशी शिंदे गटाने वेगळी जाहिरात प्रकाशित करून डॅमेज कन्ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. या जाहिरातबाजीमुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद असल्याचं बोललं जात आहे. पण यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.

ही जाहिरात छापून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी माझ्याशी संवाद साधला आणि चूक मान्य केली. आमच्या काही लोकांनी चूक केली, असं एकनाथ शिंदे म्हणाले, अशी माहिती स्वत: देवेंद्र फडणवीसांनी दिली. ते ‘रिपब्लिक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

हेही वाचा- मंत्रीमंडळ विस्ताराबाबत आदित्य ठाकरेंचं सूचक विधान; म्हणाले, “आता सरकार पडेल…”

एकनाथ शिंदे आणि तुमच्यात मतभेद आहेत का? असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. ती जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी स्वत: माझ्याशी संवाद साधला. ती जाहिरात चुकीची छापली गेली, असं ते म्हणाले. आमच्या लोकांनी चूक केली केली, असंही त्यांनी मान्य केलं. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदे आणि माझ्यात ज्याप्रकारचं घट्ट संबंध आहेत, ते कदाचितच युतीच्या सरकारमध्ये दिसतात.”

हेही वाचा- VIDEO: आदित्य ठाकरेंच्या गाडीला दुचाकीची धडक; दुचाकीस्वाराने पळून जाण्याचा केला प्रयत्न पण…

“कारण मी कधीही त्यांचा (एकनाथ शिंदे) मान, सन्मान आणि शिष्टाचार मोडत नाही आणि तेही मी उपमुख्यमंत्री आहे, याची जाणीव मला कधीच होऊ देत नाहीत. आम्ही दोघांनी एक मर्यादा ठेवली आहे. त्यामुळे आम्ही पुढे जात आहोत. काही वेळा पार्टीत कमी बुद्धीचे लोक असतात, ते चुकीचं काम करतात. पण एवढ्या छोट्या चुकीसाठी आमच्यात मतभेद होतील किंवा सरकार पडेल, असं कुणाला वाटत असेल तर ते कधीही होऊ शकत नाही. आम्ही एका मोठ्या विचाराने आणि ध्येयाने हे सरकार स्थापन केलं आहे,” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis on eknath shinde group ad in newspaper about shinde popularity as cm rmm
Show comments