Devendra Fadnavis on Rebel Candidates : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीत धुसफूस सुरू आहे. अनेक निष्ठावान पदाधिकाऱ्यांना संधी न देता आयारामांना संधी देण्यात आल्याने जुन्या-जाणत्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यातूनच आघाडी आणि युतीत बंडखोरी करून इच्छूक उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरलाय. तर काहींनी पक्षांतर करून दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. यावरून देवेंद्र फडणवीसांनी आज सुचक वक्तव्य केलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष रवी राजा यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

बोरीवलीतून गोपाळ शेट्टींसह मुंबई आणि ठाण्यातील अनेक जुने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या नाराजीतून त्यांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. याबाबत आज देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे. एकमेकांच्या उमेदावारांविरोधात अर्ज भरण्यात आले आहेत. यासाठी आता नीती तयार केली आहे. ज्यांनी तिकिट नसताना उमेदवारी भरलीय त्यांना पक्षात परत घेण्याचा प्रयत्न तिन्ही पक्ष मिळून करणार आहेत. पक्षांतर्गतही काही उमेदवार उभे राहिले आहेत. त्यांनाही विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना परत घेण्याचा प्रयत्न असेल.”

maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Malegaon Central Assembly Constituency, Mahayuti Candidate, Maha Vikas Aghadi
Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
devendra fadnavis reaction on harshwardhan patil about join ncp sharad pawar group
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “आर. आर. आबा आता हयात नाहीत, पण एवढंच सांगतो की…”, देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांच्या दाव्यावर उत्तर!

हेही वाचा >> Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; मोठा नेता भाजपात दाखल

“उमेदवारी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे. छाननीही झाली असून अपेक्षित सर्व अर्ज वैध ठरले आहेत. दिवाळी दोन दिवस आहे. त्यानंतर ४-५ तारखेनंतर जोराने प्रचार सुरू होईल. त्याच्या पूर्ण तयारीत आम्ही आहोत”, असं नियोजनही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

गोपाळ शेट्टींचं काय करणार?

गोपाळ शेट्टी हे भाजपाचे अतिशय प्रामाणिक सैनिक राहिले आहेत. ते अनेक वेळा आग्रही असतात. शेवटी ते पक्षशिस्त मान्य करतात. त्यांना परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. भाजपाच्या पाठी उभं राहण्याची भूमिका ते कायम घेतात, तशीच भूमिका ते आताही घेतील”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महायुतीचं सरकार येणार आहे

भाजपात येत्या काही दिवसात मोठे पक्षप्रवेश होतील. काँग्रेसचे ते नेते कोण हे मला विचारु नका. महायुतीचं सरकार हे सत्तेत येणार आहे. महायुती संदर्भात सकारात्मकता पाहण्यास मिळते आहे. नामांकन पूर्ण झालं आहे. त्यानंतर काही ठिकाणी क्रॉस फॉर्म आले होते. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मी आणि महायुतीचे प्रमुख नेते होते. आमच्यातले सगळे इश्यू आम्ही संपवले आहेत. तुम्हाला त्याचं प्रत्यंतर आज आणि उद्या दिसेल.