लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत असून कोकण पदवीधर आणि मुंबई पदवीधर तर नाशिक शिक्षक, मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक आहे. सध्या या निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. दरम्यान, मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघामधून माघार घेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचे निरंजन डावखरे हे उमेदवार आहेत. आज ठाण्यात निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. “महायुतीला तडीपार करणार असं म्हणणाऱ्यांना कोकणाने तडीपार केलं”, अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरे गटावर टीका केली.

What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
uddhav Thackeray sawantwadi
“कोकण आणि शिवसेनेचे नाते तोडण्याचा प्रयत्न, कोकणचे अदानीकरण होऊ देणार नाही”, उद्धव ठाकरेंचा इशारा
devendra fadnavis criticize uddhav thackeray for making video of bag checking
“त्यांच्या आधी माझी बॅग तपासली, केवळ भांडवल…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!

हेही वाचा : लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला? प्रताप पाटील चिखलीकरांनी सांगितली तीन कारणं; म्हणाले, “राज्यात जो फॅक्टर…”

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यात आणि कोकण विभागामध्ये आपल्या महायुतीला सर्वांच्या आशीर्वादाने मोठं यश प्राप्त झालं. काही लोकांनी अशी गर्जना केली होती की, आम्ही महायुतीला तडीपार करू. पण कोकणाने त्यांना तडीपार केलं. या ठिकाणी पाच जागा या महायुतीच्या निवडून आल्या. यामध्ये एक भिवंडीची जागा आपली निवडून येवू शकली नाही. आता भिवंडीची जागा का निवडून आली नाही, याची आपल्याला कल्पना आहे. जे मुंब्रा या ठिकाणी घडलं, तेच भिवंडीमध्येही घडलं. मात्र, हे देखील सुधारण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.

राज ठाकरेंचे मानले आभार

“लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे. मला विश्वास आहे की पुन्हा एकदा कोकणाचा आशीर्वाद हा आपल्या महायुतीला प्राप्त होईल. मी सर्वात आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानतो. त्यांनी या निवडणुकीत मनसेचे अभिजीत पानसे यांना उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. त्यांनी त्यासाठी मेहनतही घेतली होती. मतदार नोंदणीही केली होती. मात्र, आम्ही राज ठाकरे यांना विनंती केली आणि निरंजन डावखरे हे या मतदारसंघातील विद्यामान आमदार आहेत. आपण महायुतीत एकत्र काम करत आहोत. नुकतंच आपण लोकसभेलाही चांगलं काम केलं. त्यामुळे तुम्ही जो उमेदावर घोषित केला, त्यांना थांबायला सांगावं आणि निरंजन डावखरे यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती केल्यानंतर राज ठाकरे यांनी अभिजीत पानसे यांची उमेदवारी मागे घेतली. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.