Maharashtra Cabinet Expansion : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार देखील पार पडला. हिवाळी अधिवेशही झालं. मात्र, अद्यापही खातेवाटप झालेलं नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण खातेवाटप न झाल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे. तसेच कोणत्या पक्षाला कोणते खाते द्यायचे? आणि कोणाला कोणतं खातं द्यायचं? यावरून महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे. तसेच खातेवाटप अद्याप का करण्यात आलं नाही? खातेवाटप रखडण्याचं कारण काय? याबाबत विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

दरम्यान, आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत या अधिवेशनात झालेल्या निर्णयाची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. पण खातेवाटप नेमकं कुठे रखडलं? आणि खातेवाटप कधी होणार? असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला असता यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं. खातेवाटप लवकरच जाहीर होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला? संजय शिरसाट यांनी सांगितलं मोठं कारण; म्हणाले…
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक

हेही वाचा : Santosh Deshmukh Case : “मास्टरमाईंड कोणी असो, त्याला सोडणार नाही”, अजित पवारांचं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना आश्वासन

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आता खातेवाटप देखील लवकरच जाहीर होईल. लवकरच होईल याचा अर्थ खातेवाटप आजही (२१ डिसेंबर) होऊ शकतं आणि उद्या (२२ डिसेंबर) सकाळी देखील होऊ शकतं”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, आता खातेवाटपामध्ये कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं देण्यात येतं? आणि कोणते खाते महायुतीतील कोणत्या पक्षाकडे जाते? याकडे अनेकाचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या विस्तारात महायुतीमधील काही मोठ्या नेत्यांना डावलण्यात आल्यामुळे काही नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे महायुतीमधील अनेक आमदार नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात देखील उपस्थित राहिले नाहीत. तर महायुती सरकारचं खातेवाटप लवकर न झाल्यामुळे हिवाळी अधिवेशन हे बिनाखात्याच्या मंत्र्यांविना पार पडल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.

Story img Loader