Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) जाहीर झाले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार महायुतीला (Mahayuti) बहुमत मिळत आहे. तसेच महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसताना दिसून येत आहे. पुढील काही तासांमध्ये निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल. महायुतीने बहुमतापेक्षा जास्त जागा मिळत असल्याचं आतापर्यंत आलेल्या कलानुसार दिसून येत आहे. त्यामुळे यावर आता महायुतीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत महायुतीला मिळालेल्या यशाबाबत भाष्य केलं. तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलं आहे. “अमित शाह यांनी एक पत्रकार परिषदेत घेत स्पष्ट सांगितलं की, “मुख्यमंत्रिपद हे कोणत्याही निकशावर नाही, तसेच मुख्यमंत्रिपद हे तीन्ही पक्षाचे नेते ठरवतील”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
हेही वाचा : आदित्य ठाकरेंनी गड राखला; वरळीतून मिलिंद देवरांचा दारुण पराभव!
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाह यांनी एक पत्रकार परिषदेत घेत स्पष्ट सांगितलं की, मुख्यमंत्री पद हे कोणत्याही निकशावर नाही. मुख्यमंत्रिपद हे तीनही पक्षाचे नेते ठरवतील. एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तसेच अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. तसेच आमच्या पक्षाचे पार्लमेंट बोर्डातील नेते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील. आमच्यात यावरून कोणताही वाद नाही”, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
‘जनतेपुढे आम्ही नतमस्तक’
“लोकसभेच्या निवडणुकीत फेक नरेटीव्ह तयार करण्यात आला होता. त्या फेक नरेटीव्हच्या विरोधात लढणाऱ्या सर्व संघटनांचा हा विजय आहे. महाराष्ट्रात लोकांमध्ये जनजागृती करणाऱ्या सर्वांचा हा विजय आहे. गावागावात सगळीकडे जाऊन हा अलख जगवला हा विजय त्यांचा आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि आमच्या महायुतीच्या एकजुटीचा हा विजय आहे. अमित शाह यांचे मी आभार मानतो. तसेच लाडक्या बहिणींचे विशेष आभार मानतो. महाराष्ट्रातील जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहेत. राज्यातील जनतेला दंडवत. जनतेने विरोधकांना कृतीतून उत्तर दिलं”, असं फडणवीस यांनी म्हटलं.
‘चक्रव्यूह तोडून दाखवला…’
“मी याआधीही सांगितलं होतं की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. चक्रव्यूह तोडून दाखवला. महाराष्ट्र मोदींजींच्या पाठीशी खंबीर उभा आहे. मी याआधी म्हटलं होत आणि आताही सांगतो की या विजयात माझा खूप छोटासा वाटा आहे. मला असं वाटतं की कोणत्याही लोकशाहीमध्ये एक चांगला विरोधीपक्ष असणं गरजेचा आहे. त्यामुळे जे विरोधी पक्षाचे लोक निवडून आलेले आहेत. त्यांचा आम्ही सन्मान करू. त्यांचा आवाज छोटा असो की मोठा असो. ते ज्या गोष्टी सांगतील त्या योग्य गोष्टीवर आम्ही त्यांना प्रतिसाद देऊ”, असं फडणवीस यांनी म्हटलं.
“तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे, ती शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे. तसेच जी खरी राष्ट्रवादी आहे ती राष्ट्रवादी अजित पवारांची आहे हे पाहायला मिळालं. महाविकास आघाडीच्या लोकांनी आम्हाला ठरवून टार्गेट केलं”, असंही फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.