Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार महायुतीला बहुमत मिळत आहे. तसेच महाविकास आघाडीला मोठा धक्का बसताना दिसून येत आहे. पुढील काही तासांमध्ये निवडणुकीचा निकाल (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) स्पष्ट होईल. महायुतीने बहुमतापेक्षा जास्त जागा मिळत असल्याचं आतापर्यंत आलेल्या कलानुसार दिसून येत आहे. त्यामुळे यावर आता महायुतीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया देत मतदारांचे आभार मानले. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. “आम्ही आधुनिक अभिमन्यू,चक्रव्यूह तोडला”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“लोकसभेच्या निवडणुकीत जो फेक नरेटीव्ह तयार करण्यात आला होता. त्या फेक नरेटीव्हच्या विरोधात लढणाऱ्या सर्व संघटनांचा हा विजय आहे. महाराष्ट्रात लोकांमध्ये जनजागृती करणाऱ्या सर्वांचा हा विजय आहे. गावागावात सगळीकडे जाऊन हा अलख जगवला हा विजय त्यांचा आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि आमच्या महायुतीच्या एकजुटीचा हा विजय आहे. अमित शाह यांचे मी आभार मानतो. तसेच लाडक्या बहि‍णींचे विशेष आभार मानतो. महाराष्ट्रातील जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहेत. राज्यातील जनतेला दंडवत. जनतेने विरोधकांना कृतीतून उत्तर दिलं”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

devendra fadnavis on political extortion
Devendra Fadnavis Exclusive: “काही मध्यम स्तरावरचे नेते हे धंदे करत होते, पण…”, पॉलिटिकल एक्स्टॉर्शनबाबत फडणवीसांची सडेतोड भूमिका!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
CM Devendra Fadnavis On Varsha Bungalow
Devendra Fadnavis : वर्षा पाडणार? काय वेड्यांचा बाजार आहे?… फडणवीसांनी टाकला सगळ्या चर्चांवर पडदा
sanjay raut devendra fadnavis varsha bungalow
Sanjay Raut to Devendra Fadnavis: “वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची मंतरलेली शिंगं…”, संजय राऊतांचा दावा चर्चेत; देवेंद्र फडणवीसांना केला ‘हा’ सवाल!
Devendra Fadnavis alleges Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर
What Jitendra Awhad Said?
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांचा टोला, “…तर धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”

हेही वाचा : Aaditya Thackeray Won : आदित्य ठाकरेंनी गड राखला; वरळीतून मिलिंद देवरांचा दारुण पराभव!

‘चक्रव्यूह तोडून दाखवला…’

“मी याआधीही सांगितलं होतं की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. चक्रव्यूह तोडून दाखवला. महाराष्ट्र मोदींजींच्या पाठीशी खंबीर उभा आहे. मी याआधी म्हटलं होत आणि आताही सांगतो की या विजयात माझा खूप छोटासा वाटा आहे. मला असं वाटतं की कोणत्याही लोकशाहीमध्ये एक चांगला विरोधीपक्ष असणं गरजेचा आहे. त्यामुळे जे विरोधी पक्षाचे लोक निवडून आलेले आहेत. त्यांचा आम्ही सन्मान करू. त्यांचा आवाज छोटा असो की मोठा असो. ते ज्या गोष्टी सांगतील त्या योग्य गोष्टीवर आम्ही त्यांना प्रतिसाद देऊ”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पुन्हा निवडणुका घ्या असं म्हटलं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “आम्हाला हे माहिती होतं. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा जिंकला तर तेथील ईव्हीएम परफेक्ट आणि महाराष्ट्रात पराभव झाला तर लगेच ईव्हीएम धोक्यात आलं? मला विरोधकांना काही सल्ला द्यायचा नाही. पण खरी कारणे काय आहेत? हा विचार विरोधकांनी करावा”, असा खोचक सल्ला फडणवीसांनी दिला.

दरम्यान, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा पराभव झाला यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला वाटतं की लोकशाहीची हीच खरी गंमत आहे. लोकशाहीमध्ये जनता कोणाला डोक्यावर घेईल आणि जनता कोणाला धाराशाही करेल हे सांगता येत नाही. हे या निवडणुकीत दाखवून दिलं आहे”, असं फडणवीसांनी म्हटलं.

Story img Loader