Devendra Fadnavis on Maharashtra CM Face : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असली तरी अद्याप महायुती व महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरलेला नाही. दरम्यान, “आमच्याकडे मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून वाद नाही’, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र भाजपातील वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यावर, फडणवीस यांना विचारण्यात आलं की एकनाथ शिंदे तुमचा म्हणजेच महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार का? त्यानंतर फडणवीस म्हणाले, “एकनाथ शिंदे हे राज्याचे प्रमुख आहेत. जी व्यक्ती मुख्यमंत्रिपदावर असते तीच निवडणुकीत नेतृत्व करते. आमचा मुख्यमंत्री असताना दुसऱ्या चेहऱ्याचा विचार होत नाही. विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढवली जाईल. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होईल याबाबत मी सांगू शकत नाही. तो अधिकार आमच्या पक्षाच्या संसदीय मंडळाचा व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा असेल”.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा