Devendra Fadnavis Exlusive Interview : अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांनी देवेंद्र फडणवीस यांना एका प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला होता, असा मोठा दावा निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यावर “मला त्या सगळ्याची कल्पना आहे. त्या लोकांनी (देशमुख व वाझे) मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला होता”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आता त्याही पुढे जाऊन या प्रकरणातील अनेक व्हिडिओ माझ्याकडे असल्याचे त्यांनी म्हटलंय. लोकसत्ता लोकसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला. अनेकदा त्यांनी असे प्रयत्न केले. परंतु, ईश्वर माझ्या पाठिशी आहे, जनता माझ्या पाठिशी आहे”, असं देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. यावरून त्यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले, “याविषयी अनेक पुरावे आहेत. अजून काही व्हिडिओ मी बाहेर दिले नाहीत. ज्यात पोलीस अधिकारी स्वतः कबुल करत आहेत की त्यांना कशी सुपारी दिली होती. माझ्यावर केसेस करण्याची, मला प्रकरणात अडकवण्याची सुपारी देण्यात आली होती. सातत्याने अडीच वर्षे हा प्रयत्न सरकारचा होता.”

हेही वाचा >> Devendra Fadnavis : “त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, पण…”, चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

“माझ्या नेतृत्त्वार प्रश्नचिन्ह निर्माण झालं पाहिजे याकरता अनेक खासगी यंत्रणाही लावून बघितल्या. पण काही करता आलं नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते पुढे असंही म्हणाले की, “हे असं कधी होत नव्हतं. चांदिवालांनी मुलाखतीतच म्हटलंय की मला फसवायचा यांचा गेम होता.

चांदीवाल नेमकं काय म्हणाले होते?

अनिल देशमुख, पलांडे, परमबीर सिंग यांना आम्ही दंड भरायला लावला होता. आम्हाला जे शपथपत्र दिलं होतं त्यानुसार सचिन वाझेंनी पुरावे दिले असते तर बराच खुलासा झाला असता. त्यांच्या शपथपत्रात त्यांनी दोन राजकीय व्यक्तींची नावं घेतली होती. आर्थिक व्यवहारांचाही उल्लेख केला होता. ती नावं होती अजित पवार आणि शरद पवार. मी त्यांना ही नावं रेकॉर्डवर घेणार नाही, असं सांगितलं. नियमांत बसत नसल्याने मी ते रेकॉर्डवर घेतलं नाही. देवेंद्र फडणवीस हे तेव्हा विरोधी पक्षनेते होते. सचिन वाझे व अनिल देशमुख यांनी फडणवीसांनाही गुंतवण्याचा प्रयत्न केला होता. मी त्यावेळी हे बोललो नाही कारण चर्चा करण्याला कारण मिळतं. राजकीय व्यक्तींना गुंतवून स्वतःची प्रसिद्धी नको होती. त्यामुळे मी त्यावेळी काही बोललो नाही, असं चांदीवाल म्हणाले