वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येच्या कटाबाबत मोठं विधान केलं आहे. संभाजी महाराजांच्या हत्येच्या कटात हिंदू भटजींचाही सहभाग होता, असं वक्तव्य त्यांनी केलं. यावेळी त्यांनी इतिहासाचा दाखला दिला आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यानंतर विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकाश आंबेडकर हे नवा इतिहास लिहित असतात. परवा ते औरंगाजेबाच्या कबरीवर गेले होते. तिथे त्यांनी काय वक्तव्य केलं, ते सगळ्यांनी ऐकलं आहे, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला. प्रसारमाध्यमांशी बोलतांना फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली.

संभाजी महाराजांच्या हत्येच्या कटात हिंदुंचा सहभाग होता, या प्रकाश आंबेडकरांच्या विधानाबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “असं आहे की, प्रकाश आंबेडकर हे नवा इतिहास लिहित असतात. परवा ते औरंगजेबाच्या कबरीवर गेले होते. तिथे त्यांनी जे वक्तव्य केलं, ते सगळ्यांनी ऐकलं आहे. हिंदू असो वा कुणीही असो, हे सगळ्यांना माहीत आहे की, औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार केले होते.”

हेही वाचा- “नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणं अयोग्य”, देवेंद्र फडणवीसांचं विधान चर्चेत

“इतिहास बदलण्याचा प्रयत्न कुणीही करू नये”

“औरंगाजेबाने हे अत्याचार आणि छळ करण्याचं एकमेव कारण होतं, ते म्हणजे, संभाजी महाराज सातत्याने देव, देश आणि धर्माची लढाई लढत होते. संभाजी महाराजांना ती लढाई सोडून आपला धर्म बदला, आमच्या धर्मात या आणि आम्हाला नतमस्तव व्हा, असं सांगितलं जात होतं. पण छत्रपती शिवरायांच्या छाव्याने अत्याचार सहन केले. पण औरंगजेबाची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित अत्याचार करून औरंगजेबाने त्यांना मारलं आहे, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न कुणीही करू नये,” असा टोला फडणवीसांनी प्रकाश आंबेडकरांना लगावला.

हेही वाचा- “संभाजी महाराजांच्या हत्येत हिंदुंचाही सहभाग”, थेट इतिहासाचा दाखला देत प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

इतिहासाचा दाखला देत संभाजी महाराजांच्या हत्येबद्दल प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “देशात सध्या जुन्या राजांचं उदाहरण देऊन समाजात दुफळी निर्माण केली जात आहे. पण तशी वस्तुस्थिती नाही. त्यांच्या (संभाजी महाराज) हत्येच्या कटात मुघल बादशहाबरोबर भारतातील हिंदू भटजीही होते. हत्येच्या कटात त्यांचाही सहभाग होता, यावर इतिहासकारांनी सविस्तर लिहायला हवं. जेणेकरून देशात पुन्हा कुणी जयचंद कुणी येणार नाही, देशाचं स्वातंत्र जाणार नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis on prakash ambedkar statement over sambhaji maharaj death hindu connection rmm
Show comments