Devendra Fadnavis On Supriya sule viral Bitcoin audio clip : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपाचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीत परकीय चलन वापरल्याचा आणि निवडणुकीच्या आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप केला आहे. यानंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन यासंबंधीच्या कॉल रेकॉर्डिंग्स व व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट देखील सादर केले आहेत. दरम्यान भाजपाने सादर केलेल्या या पुराव्यांमधील ऑडिओ क्लिपमध्ये सुप्रिया सुळेंचा आवाज असल्याचा दावा केला जात आहे.

Devendra Fadnavis,
“…तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल”; सज्जाद नोमानींच्या व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, पण…”, चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis : “काही नेत्यांना तमाशा…”; देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ Video दाखवत भाजपाचा ठाकरेंना टोला
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”

या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या संबंधित ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळेंचा असल्याचे म्हटले आहे. यानंतर आता राज्याचे गृहमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“माझं स्पष्ट मत आहे की, या संदर्भात योग्य चौकशी झाली पाहिजे. काय खरं आहे ते सर्वांसमोर आलं पाहिजे, कारण आरोप गंभीर आहेत. त्यामुळे अशा गंभीर आरोपांची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर येणं हा जनतेचा अधिकार आहे”.

अजित पवार यांनी ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळेंचा असल्याचे म्हटले आहे. याबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले की, “आवाज सुप्रिया सुळेंसारखा असल्याचं लक्षात येतंय, आपण म्हणू शकतो की आवाज सुप्रिया सुळेंचा आहे. पण निष्पक्षतेसाठी ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होऊन जाऊद्या. जर कोणी आवाजात छेडछाड केली असेल तर आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने ताबडतोब त्याचा उलगडा केला जाऊ शकतो. हे प्रकरण बिटकॉइन, शेकडो कोटींचे आहे. त्यामुळे आमची यंत्रणांकडून अपेक्षा आहे की, याचा ताबडतोब उलगडा केला जावा. याला निवडणुकीसंबंधीचे प्रकरण मानत नाही, हे देशाच्या सुरक्षेसंबंधीचे प्रकरण आहे”.

हेही वाचा>> Bitcoin Scam: “तो आवाज माझ्या बहिणीचा…”, बिटकॉइन स्कॅमवर अजित पवारांचा धक्कादायक आरोप

हे प्रकरण निवडणुकीसंबंधीचे नाही…

भाजपा नेते विनोद तावडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर लगेच सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. या आरोपांच्या टायमिंगबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले की, “मी काल देखील स्पष्ट केले होतं की, त्यांनी (विनोद तावडे) पैसे वाटले नाहीत, तसेच त्यांच्याकडे पैसे सापडले नाहीत. जाणीवपूर्वक गोंधळ घालण्यात आला”.

“सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर जे आरोप करण्यात आले आहेत, ते माजी आयपीएस अधिकाऱ्याने केले आहेत. काही क्लिप्स सादर केल्या आहेत. हे प्रकरण खूप गंभीर आहे, त्यामुळे याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण असे आरोप केल्यानंतर सत्य काय आहे हे जगासमोर येणे गरजेचे आहे. याची चौकशी करून, याचा एक अहवाल लोकांसमोर आला पाहिजे” असेही फडणवीस म्हणाले आहेत.