भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज (सोमवार, १९ जून) कल्याणमध्ये भारतीय जनता पार्टीचा मेळावा पार पडला. या कार्यक्रमातून देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकालात मुंबई महापालिकेत साडे बारा हजार कोटींचा घोटाळा झाला. त्यांच्या तिजोरीत गेलेला प्रत्येक पैसे आमचं सरकार परत आणेल, असं आश्वासनही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिलं.

देवेद्र फडणवीस भाषणात म्हणाले, “आम्ही उद्धव ठाकरेंचा पर्दाफाश करायचं ठरवलं आहे. आजच मुंबई महानगरपालिकेबाबतचा कॅगच्या अहवाल समोर आलाय. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मुंबई महापालिकेत साडेबारा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला, असं कॅगच्या अहवालातून समोर आलं आहे. त्यामुळे आजच एकनाथ शिंदेंनी यावर ‘एसआयटी’ स्थापन केली आहे. या ‘एसआयटी’च्या माध्यमातून जो जनतेचा पैसा तुम्ही (उद्धव ठाकरे) तुमच्या तिजोरीत नेलाय, त्यातील प्रत्येक पैसा परत आणण्याचं काम आमचं सरकार निश्चितपणे करेल.”

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण

मविआने एकही योजना आणली नाही- फडणवीस

“महाराष्ट्रात आमचं सरकार आल्यानंतर एका वर्षात राज्यात परिवर्तन घडवण्याचं काम आमच्या सरकारने केलं. महाविकास आघाडीने अडीच वर्षाच्या काळात एमएमआरडीच्या क्षेत्रात एकही काम केलं नाही. येथील सगळ्या योजना आम्ही केल्या. महाविकास आघाडी एक पैशाचीही योजना आणू शकली नाही” अशा शब्दांत फडणवीसांनी उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

Story img Loader