काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला होता. याबाबतचा जीआर काढल्यानंतर राज्यभरातील विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात आंदोलन केलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही सरकारवर टीका करण्यात आली. हा अत्यंत वादग्रस्त ठरलेला जीआर अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे. याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत घेत संबंधित जीआरचं खापर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारवर फोडलं आहे.

राज्यात कंत्राटी भरतीचं १०० टक्के पाप हे काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलं आहे. हे पाप आम्हाला आमच्या माथी नको, असं म्हणत फडणवीसांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. तसेच महाविकास आघाडीने जनतेची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Raj Thackeray
Raj Thackeray in Nashik : “निवडणुका म्हणजे तुम्हाला सांगतो…”, प्रचारसभांना कंटाळून राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
uddhav Thackeray sawantwadi
“कोकण आणि शिवसेनेचे नाते तोडण्याचा प्रयत्न, कोकणचे अदानीकरण होऊ देणार नाही”, उद्धव ठाकरेंचा इशारा
raj thackeray criticized uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंच्या हातून पैसा सुटत नाही, बॅगेत काय असणार?” राज ठाकरेंची खोचक टीका!
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “…तर मविआचे कार्यकर्ते फडणवीस, अजित पवारांच्या बॅगा तपासतील”, निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगेची तपासणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंचा इशारा
Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray says Obstruction of projects so people will not support him
“उद्धव ठाकरेंकडून प्रकल्पांची अडवणूक, जनता त्यांना थारा देणार नाही…” देवेंद्र फडणवीसांची टीका
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”

हेही वाचा- “देवेंद्र फडणवीस भांग पित नसतील, पण बहुतेक त्यांना…”; संजय राऊतांचा हल्लाबोल

कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करताना देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी चर्चा केली. मी त्यांना सांगितलं, त्यांच्या (महाविकास आघाडी) पापाचं ओझं आपल्या सरकारने का उचलायचं? त्यामुळे कंत्राटी भरतीबाबत काढलेला जीआर आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.” दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या काळात कंत्राटी भरती केल्याच्या जीआरबाबत काही पुरावे पत्रकार परिषदेत सादर केली.

हेही वाचा- “या मर्दाची टक्कर घेण्याची…”, शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा पहिला टीझर जारी

फडणवीस पुढे म्हणाले, “मी आपल्याला उद्धव ठाकरेंनी स्वाक्षरी केल्याचा कागद दिला आहे. संबंधित कंत्राटी भरतीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीच मंजुरी दिली होती. त्यामुळे माझा सवाल आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाराष्ट्राची माफी मागणार आहेत का? युवकांची दिशाभूल केल्याबद्दल आणि स्वत:चं पाप दुसऱ्याच्या माथी मारल्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. ते माफी मागणार नसतील, तर आमच्या पक्षाकडून त्यांना रोज उघडं करावं लागेल. जनतेत जाऊन उघडं करावं लागेल, हे सगळे कागदपत्रे आम्ही जनतेमध्ये देणार आहोत.”