Devendra Fadnavis विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची एकमुखाने निवड झाली आहे. राहुल नार्वेकर यांनी रविवारी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी राहुल नार्वेकर यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी कौतुक केलं. तसंच राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही ते पुन्हा आले असं वक्तव्य केलं. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
राहुल नार्वेकर यांची निवड केल्यानंतर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले, आज विरोधी पक्षाचेही आभार मानतो की राहुल नार्वेकर यांच्या निवडीला पूर्ण समर्थन दिलं. विरोधी पक्षातल्या सदस्यांचे आणि गटनेत्यांचे मी आभार मानतो. आपल्याकडे विधानसभा अध्यक्ष बिनविरोध निवडण्याची परंपरा आहे. ही परंपरा कायम राहिली असं देवेंद्र फडणवीस म्हणाले तसंच ते पुढे म्हणाले, “अध्यक्ष महोदय आपण मी पुन्हा येईन म्हटलं नव्हतं तरीही आपण परत आलात याचा मला आनंद आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की राज्यात दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री होते तेव्हा त्या तिघांमधला एक वकील होता. आता तुमच्या रुपाने आणखी वकील विधानसभेत आहे. राहुल नार्वेकर हे पहिलेच अध्यक्ष असतील पहिल्याच टर्ममध्ये ते अध्यक्ष झाले आणि त्यानंतर दुसऱ्यांदा ते अध्यक्ष झाले. नाना पटोलेंचे विशेष आभार कारण त्यांनी वाट मोकळी केल्याने ते अध्यक्ष झाले.” असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.
राहुल नार्वेकर यांना कायद्याचं उत्तम ज्ञान
राहुल नार्वेकर यांनी विधानपरिषदेतही काम केलं. कायद्यावर भाषण करताना राहुल नार्वेकर विधानपरिषदेचे सदस्य म्हणून बारकावे शोधून काढत त्यावर बोट ठेवण्याचं काम ते करत होते. कायदेमंडळाचा अध्यक्ष आहे त्याला कायद्याचे बारकावे माहीत असणं महत्त्वाचं आहे. मागची पाच वर्षे संक्रमणाचा काळ होता. यात ज्या घडामोडी घडल्या त्यात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षांकडे माध्यमांचं लक्ष होतं. कदाचित सर्वाधिक चर्चेत राहिलेले राहुल नार्वेकरच होते. त्यांच्या रुपाने न्यायप्रिय आणि संयमी व्यक्तिमत्व निवडलं गेलं आहे ही आनंदाची बाब आहे असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.
महाराष्ट्रातल्या विधानसभा अध्यक्षांच्या मांदियाळीत राहुल नार्वेकर यांचं नाव दुसऱ्यांदा जोडलं गेलं आहे
महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेक विधानसभा अध्यक्षांचा वाटा आहे या मांदियाळीत राहुल नार्वेकर यांचं नाव जोडलं जातं आहे हे समाधानाचं आहे. आपल्याला अडीच वर्षात एक अग्निपरीक्षाही द्यावी लागली. पण कोकणचा सुपुत्र १०० टक्के सोन्यासारखा आहे असं त्यातून बाहेर आल्यावर आपल्याला म्हणता येईल. मला वाटतं की एक अतिशय चांगल्या प्रकाराचं कार्य त्यांनी केलं. पुन्हा अध्यक्ष होण्याचा मान चारच लोकांना आहे. कुंदन फिरोदिया, सयादी सिलम आहेत, बाळासाहेब भारदे आहेत आणि राहुल नार्वेकर यांना हा बहुमान मिळाला आहे. बाळासाहेब भारदेंनी विधानसभा अध्यक्षांनी कसं काम करावं हे दाखवून दिलं. असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.