दिल्लीत भाजपाचा विजय झाला आहे. भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकली आहे. आपची सत्ता एका दशकापासून होती जी घालवण्यात भाजपाला यश आलं आहे. काँग्रेस आणि आपमधल्या अंतर्गत संघर्षाचा फायदा भाजपाला नक्कीच झाला आहे. दिल्लीत २७ वर्षांनी कमळ फुललं आहे. १९९८ मध्ये सुषमा स्वराज मुख्यमंत्री असताना भाजपाचा पराभव झाला होता. त्यानंतर काँग्रेस आणि आप या दोन पक्षांकडे दिल्लीची सत्ता होती. आता भाजपाने दिल्ली सर केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक है तो सेफ है चं दुसरं उदाहरण म्हणजे दिल्लीचा विजय आहे असं म्हटलं आहे.
दिल्लीतला निकाल म्हणजे एक है तो सेफचं दुसरं उदाहरण
एक है तो सेफचं पहिलं उदाहरण महाराष्ट्रात पाहण्यास मिळालं त्यानंतर आज दिल्लीत पाहण्यास मिळालं. महाराष्ट्रात लोकसभेचा निकाल लागला तेव्हा व्होट जिहादचा पॅटर्न आपण सगळ्यांनी पाहिला. भाजपाला धुळे मतदारसंघात कसा पराभव झाला आपण पाहिलं. तसंच अशा प्रकारच्या १२ जागा गेल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विधानसभेच्या प्रचारात येऊन आपण कसे जाती-धर्मांमध्ये वाटले जात आहोत आणि अशा ताकदींना कसं बळ मिळतं आहे ते सांगितलं. मोदींचं हे म्हणणं लोकांनी स्वीकारलं. त्यामुळे महाराष्ट्रात आम्हाला २३७ जागा मिळाला. एक है तो सेफ है लोकांनाही समजलं आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर राहुल गांधींना टोला लगावला.
राहुल गांधींना टोला
राहुल गांधी महाराष्ट्रात भाजपाने मतदार याद्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला आहे त्याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी राहुल गांधींबाबत मी इतकंच म्हणेन की, ता उम्र गालिब हम यहीं भुल करते रहे, धूल चेहरेपर थी और आईना साफ करते रहें.”असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
२०१९ मध्ये नेमकं काय घडलं?
२०१९ मध्ये नेमकं अडीच अडीच वर्षांच्या फॉर्म्युलाबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी थोडी क्रोनोलॉजी सांगतो, २०१९ ला आम्ही जागावाटपांसाठी बसलो, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं की आपण मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरवू. मी तुमच्या वरिष्ठांशीही बोलणं झालं आहे असं मला उद्धव ठाकरेंनी सांगितलं. रात्री १ च्या दरम्यान त्यांना मी म्हटलं की मला तर यातला निर्णय घेता येणार नाही. मी अमित शाह यांना सांगितलं की मुख्यमंत्रिपद वाटून घेण्यासाठी उद्धव ठाकरे म्हणत आहेत. त्यावर मला अमित शाह म्हणाले की असं काही ठरलेलं नाही. तसंच अडीच वर्षे मुख्यमंत्री हे पद मिळणार नाही. जर युती करायची नसेल तर आपण नको करुया. मी उद्धव ठाकरेंना हा निर्णय सांगितलं. पाच वर्षे मुख्यमंत्रिपद भाजपाकडे राहणार. फारतर उपमुख्यमंत्री हे पद आम्ही शिवसेनेला देऊ. त्यानंतर मी तिथून निघून गेलो. चार दिवसांनी मला उद्धव ठाकरेंकडून निरोप आला की आपण पु्न्हा चर्चा इच्छितो. मी सांगितलं की अडीच वर्षांची मुख्यमंत्रिपदाची अट असेल तर आम्ही चर्चा करण्यासाठी येणार नाही. त्यावर मला त्यांचा निरोप आणणाऱ्याने सांगितलं की त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा आग्रह सोडला आहे. त्यांना लोकसभेला एक जागा वाढवून हवी आहे. एक जागा वाढवून दिली तर आम्ही अडीच वर्षांचा आग्रह सोडतो असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. त्यांनी पालघरची जागा मागितली. मी ती पण द्यायला तयार नव्हतो. पण अमित शाह यांच्याशी चर्चा केली ते म्हणाले एका जागेने काय फरक पडणार आहे? त्यामुळे आम्ही पालघरची जागा दिली.
अमित शाह यांनी आणखी काय म्हटलंय?
मला उद्धव ठाकरेंनी सांगितलं मला अमित शाह यांच्याशी बोलायचं आहे. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांची भेट झाली. मला त्यांनी काही वेळ बाहेर बसा सांगितलं. आत्तापर्यंच्या ज्या काही कुरबुरी वगैरे होत्या त्या दूर करण्यासाठी भेटायचं आहे असं सांगितलं. त्यामुळे मी बाहेर थांबलो. त्या दोघांचं बोलणं झालं. त्यानंतर आमचं काय ठरलं आहे ते सांगयची जबाबदारी मला देण्यात आली. भाजपाच्या २०१९ मध्ये जर १२० किंवा त्याहून अधिक जागा आल्या असत्या तर उद्धव ठाकरे बरोबरच राहिले असते. पण त्यांना जेव्हा हे कळलं की आपण बरोबर नसू तर भाजपाचं घोडं अडेल. त्यामुळे ते असं वागले. असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.