मुंबई पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने तीन हजार पदे भरण्याच्या सरकारच्या निर्णयाचे विधानपरिषदेत काल (२५ जुलै) पडसाद उमटले. या निर्णयावरून विरोधी आमदारांनी सरकारला फैलावर घेतले होते. कंत्राटी भरतीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. सरकारने यावर निवेदन करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले होते. या निर्देशानुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन देऊन ही भरती कंत्राटी पद्धतीने नसून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातून भरती करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ” महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातून भरण्यात येणाऱ्या या तीन हजार कर्मचाऱ्यांना केवळ सुरक्षाविषयक कामकाज, गार्डविषयक कर्तव्याची कामे देण्यात येणार असून कायदेविषयक अमंलबजावणीचे काम देण्यात येणार नाही.”

Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
mumbai High Court urged bmc and State Government to declare they are unable to solve illegal hawkers issue
…तर असमर्थ असल्याचे तरी जाहीर करा ! बेकायदा फेरीवाल्यांच्या समस्येवरून उच्च न्यायालयाचे महापालिका, सरकारला खडेबोल
mumbai High Court encroachment Sanjay Gandhi Udyan
संजय गांधी उद्यान अतिक्रमणमुक्तच हवे, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल
Mumbai governor loksatta news
राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीचे प्रकरण: निर्णय न घेण्याची राज्यपालांची भूमिका खेदजनक, उच्च न्यायालयाची टिप्पणी
illegal constructions Mumbai
मुंबई : अनधिकृत बांधकामांवर २०० टक्के दंड, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांचे निर्देश
Contracts worth crores before land acquisition Municipal officials approve works worth Rs 22000 crore Mumbai news
भूसंपादनाआधी कोट्यवधींची कंत्राटे; महापालिका अधिकाऱ्यांकडून २२ हजार कोटींची खैरात
illegal slums, Former Assistant Commissioner ,
मुंबई : आदेश देऊनही बेकायदा झोपड्यांवर कारवाई नाही, महापालिकेचा माजी सहाय्यक आयुक्त अवमानप्रकरणी दोषी

हेही वाचा >> “त्यांनी माझ्यासाठी अंगावर…”, अमित ठाकरेंकडून टोलनाक्याची तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांचं भेटून अभिनंदन

“२४ जुलै २०२३ च्या निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातून उपलब्ध करून देण्यात आलेले पोलीस हे नियमित पोलीस शिपाई पदावर कर्तव्यावर उपलब्ध झाल्यानंतर त्यांच्या सेवा संपुष्टात येणार आहेत. (म्हणजेच ११ महिन्यांनी किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत तात्पुरत्या पोलिसांची सेवा संपुष्टात येईल. ) राज्य सरकारच्याच महामंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या जवानांना शासकीय कार्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठाने, सार्वजनिक ठिकाणी इत्यादी करता यापूर्वीही सुरक्षा नियमित केली आहेत आणि वापरली जात आहेत. त्यामुळे ही भरती कंत्राटीपद्धतीने घेतली जात नाहीत”, यावर फडणवीसांनी जोर दिला.

हेही वाचा >> Monsoon Session: विधानसभेत फडणवीस-पटोले-गायकवाडांमध्ये खडाजंगी; विरोधकांचा थेट सभात्याग!

“राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ तयार केलं होतं. या महामंडळातून ज्यांना नियुक्त केलं जातं, त्यांना विमानतळे, इतर आस्थापनांवर गार्डिंगची कर्तव्य दिली जातात. गेली तीन वर्षे पोलीस भरती न झाल्याने मुंबई पोलिसांची मोठी तूट झाली आहे. एकावेळी अनेक भरती करता येत नाही, कारण तेवढी ट्रेनिंग सुविधा नाही. पण १८ हजारांची करतो आहे. भरती पूर्ण झाली असून ते आता ट्रेनिंगला जाणार आहेत. मुंबईसारख्या शहरांत १० हजार पोलिसांची तूट ठेवून शहर सुरक्षित ठेवता येत नाही. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने नाही तर या महामंडळातून जसे इतर आस्थापनांना पोलीस दिले जातात, तसेच मुंबई पोलिसांना दिले जाणार आहेत. कुठेही यात कंत्राटी पद्धतीचा वापर केला जाणार नाही. तो करण्याचा विचारही नाही”, असं देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत स्पष्ट केलं.

Story img Loader