मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अलीकडेच दिल्ली दौऱ्यावर गेले होते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. विशेष म्हणजे या दौऱ्याची कसलीही कल्पना दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिली नव्हती. त्यामुळे अजित पवारांना सत्तेत डावललं जातं आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. संबंधित दौऱ्याबाबत विचारलं असता “ते मला विचारून गेले नाहीत, मी सकाळी १० वाजल्यापासून इथेच आहे” अशी प्रतिक्रिया स्वत: अजित पवारांनी दिली होती. अजित पवारांच्या या विधानावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवारांच्या विधानावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते काहीही चुकीचं बोलले नाहीत, प्रसारमाध्यमांनी याचे वेगवेगळे अर्थ काढले. दादांनी सांगितलं की, मला माहीत नाही, ते बरोबरच आहे. कारण मी आणि मुख्यमंत्री दिल्लीला का गेलो आहोत? हे त्यांना माहीतच नव्हतं. एखादा विषय दादांशी संबंधित असता तर दादाही आमच्याबरोबर आले असते.

हेही वाचा- “एकनाथ शिंदे अपात्र झाले तरीही तेच मुख्यमंत्री राहणार”, फडणवीसांनी सांगितला ‘प्लॅन बी’, म्हणाले…

“सध्या न्यायालयात शिवसेनेचं एक प्रकरण सुरू आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं दुसरं प्रकरण सुरू आहे. शिवसेनेच्या प्रकरणासंदर्भात आम्हाला वकिलांशी काही चर्चा करायची असेल, त्या संदर्भात काही निर्णय घ्यायचे असतील, कागदपत्रे जमा करायची असतील किंवा त्यासंदर्भातील काही रणनीती आखायची असेल तर त्यामध्ये अजित पवारांचं काहीही काम नाही. ते स्वत:ही आमच्याबरोबर येणार नाहीत. कारण त्यांना येण्याचं काही कारणही नाही. उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीसंदर्भात आम्हाला काही चर्चा करायची असेल तर त्याला चर्चेला मुख्यमंत्री येणार नाहीत. अजित पवार येतील. त्यामुळे अजित पवार जे बोलले ते अगदी बरोबर आहे, मीही अजित पवारांच्या जागी असतो, तर तशीच प्रतिक्रिया दिली असती,” असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

हेही वाचा- “अजित पवारांचा निर्णय योग्यच, त्यांनी संघर्ष…”, ‘त्या’ निर्णयावर शरद पवारांचं मोठं भाष्य

अजित पवारांच्या विधानामुळे सरकारमध्ये ताळमेळ नसल्याचं चित्र आहे, याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “अजित पवारांना काही माहितीच नाही, तर ते काय सांगतील. त्यांना माहितीच नव्हतं. दिवसभरात अजितदादा काय करतात? ते मला सांगून करत नाहीत. मी दिवसभरात काय करतो, हे मुख्यमंत्र्यांना सांगून करत नाही. तसेच मुख्यमंत्री दिवसभरात काय करतात, हे आम्हा दोघांना सांगून करत नाहीत. जिथे तिघांना एकत्रित येण्याची आवश्यकता असते, तिथे आम्ही तिथे एकत्रित येतो.”