महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी आणि चाणाक्ष राजकारणासाठी ओळखले जातात. मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्दही यशस्वी ठरली होती. सध्या ते महाराराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडी सरकार कोसळलं त्यानंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस हुडी घालून रात्री बाहेर पडायचे असं सांगितलं होतं. याबाबत जवळपास दोन वर्षांनी देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावता आली तर बरं होईल अशी मिश्कील प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमृता फडणवीस यांनी काय वक्तव्य केलं होतं?

जून २०२२ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार पडलं. त्यानंतर जुलै महिन्यात झालेल्या मुलाखतीत अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या, “देवेंद्र हुडी घालून आणि मोठा चष्मा लावून बाहेर पडत असत. मला सुद्धा ते ओळखायला यायचे नाहीत. मी त्यांना विचारलं की हे काय चाललं आहे? ते म्हणायचे काही नाही. पण मला तेव्हा वाटायचं की काहीतरी सुरु आहे.” असं अमृता फडणवीस एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. त्यावरच आता देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल भाष्य केलं आहे.

हे पण वाचा- “ज्यांनी मारले नाकर्तेपणावर बाण…”, अमृता फडणवीसांनी घेतलेल्या उखाण्याची चर्चा; नागपुरातील कार्यक्रमात लावली हजेरी!

काय म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांनी?

“अमृताने जे सांगितलं आहे ते खोटं आहे कसं काय म्हणणार? राजकीय बाबतीत माझी एक इच्छा असते अर्थात माझी तेवढी हिंमत नाही माझी पण त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावली तर बरं होईल, कारण असे असे सिक्रेट त्यांनी सांगितलेत ते काय करायचं? पण तो काळ आता गेला आता काही चमत्कार करण्याची आवश्यकता नाही.” असं मिश्किल उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. जे चांगलंच चर्चेत आहे.

३५ पुरणपोळ्यांच्या वक्तव्यावरही भाष्य

“३५ पुरणपोळ्यांबाबत जेव्हा अमृता बोलली तेव्हा मी कुठेही गेलो की लोक माझ्यासमोर पुरणपोळ्याच ठेवायचे. आम्हाला सांगायचे वहिनींनी सांगितलंय तुम्हाला पुरणपोळ्या आवडतात. शेवटी मी जाहीर कार्यक्रमात अनेकदा सांगितलं आणि आता पुन्हा सांगतो माझा आवडता पदार्थ पुरणपोळी नाही. कृपया मला पुरणपोळी देऊ नये.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis reaction on amruta fadnavis is in discussion he said i often think scj
Show comments