२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेतला होता. या शपथविधीबाबत अनेक गूढ अद्याप कायम आहेत. याबाबत विचारलं असता अजित पवार उत्तर देणं टाळत आहेत. या सर्व घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच आपण शपथविधी घेतला होता, असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. शिवाय पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवार बोलले, तर मी आणखी गौप्यस्फोट करेन, असंही फडणवीस म्हणाले. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीबाबत आणखी गूढ वाढलं आहे. ‘टीव्ही ९ मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस बोलत होते.

Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
beed politics Devendra Fadnavis Suresh Dhas pankaja munde dhananjay munde
माध्यमांमध्ये ‘ आवाज’ बनलेल्या सुरेश धस यांच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस
Narendra Modi target arvind Kejriwal in lok sabha speech
निधीचा वापर देशासाठीच! पंतप्रधानांचे लोकसभेत प्रत्युत्तर; केजरीवाल यांच्यावर टीका
Devendra Fadnavis Exclusive
Devendra Fadnavis : “कामाच्या नुसत्या घोषणा नाही, १०० दिवसांत रिपोर्ट कार्ड देणार”, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली योजना
Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : पालकमंत्रीपदांचा नक्की गोंधळ काय? फडणवीसांनी सांगितली सत्यस्थिती
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे, असं शरद पवार म्हणाले होते, त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर काही गोष्टी ठरल्या होत्या. पण, हे सर्व गोष्टी ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे.

हेही वाचा- पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

तुमच्याबरोबर शपथ घेतल्यानंतरही शरद पवारांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही, असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अजित पवारांनी माझ्याबरोबर घेतलेली शपथ ही फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती. प्रामाणिक भावनेतून हा शपथविधी सोहळा झाला होता. पण, सगळं ठरल्यानंतर ते कसं तोंडघशी पडले होते, हे कधीतरी अजित पवार सांगतील.

हेही वाचा- “कायद्याच्या सोयीचे कागदपत्रे…”, एकनाथ शिंदेंनी मजबूत तयारी केल्याच सांगत बच्चू कडूंचं मोठं विधान!

“मुळात अजित पवारांनी केलेलं बंड होतं का? येथूनच सुरुवात होते. अजित पवारांनीही तुमच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यांनी बऱ्याच गोष्टी ‘नो कमेंट्स’ केल्या आहेत. काही काळाकरता का होईना त्यांनी माझ्यासोबत शपथ घेतली होती. त्यामुळे काही पथ्य मीही पाळायला पाहिजेत, त्यामुळे काही कमेंट त्यांना करू द्या, त्यानंतर उर्वरित कमेंट्स मी देईन,” असं विधान फडणवीसांनी केलं.

Story img Loader