Devendra Fadnavis on Sudhir Mungantiwar : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना यंदाच्या नव्या मंत्रिमंडळात घेण्यात आलेले नाही. भाजपाच्या अनेक मंत्र्यांना यंदा डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे या नेत्यांमध्ये नाराजीनाट्य रंगलं आहे. दरम्यान, त्यांची समजूत काढली जात असून पक्षातील इतर जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज नागपुरातील विधानभवनाबाहेर बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुधीर मुनगंटीवार नाराज?

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मी नाराज नाही, पक्षाने जो आदेश दिला, जबाबदारी दिली त्याचं मी पालन केलं आहे. मला याची जाणीव आहे की मी विधानसभेत आलो असतो तर अनेक जण अनेक प्रश्न विचारतील. त्या प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा मौनं, सर्वार्थ साधनं हे मी मानतो तसंच श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे. संघटनेच्या नव्या आदेशाची वाट पाहतो आहे.”

हेही वाचा >>Sudhir Mungantiwar : मंत्रिपद नाकारल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांना प्रमोद महाजनांची आठवण, “कितीही गोष्टी मनाविरुद्ध घडल्या तरीही…”

u

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“माझी सुधीर मुनंगटीवार यांच्याशी नीट चर्चा झाली आहे. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्यामागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस केला आहे. शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी चालवायच्या असतात. त्यामुळे काहीवेळा सरकारमध्ये काम करणारे पक्षात तर पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात. सुधीर मुनगंटीवार अतिशय अनुभवी नेते आहेत. आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काहीतरी विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतले नाही”, असे देवेंद्र फडणीस म्हणाले.

आज प्रमोद महाजन यांची आठवण येते आहे..- सुधीर मुनगंटीवार

“सभागृहाचं आज काहीही काम नाही. मी मंत्री असतो तर सही करावी लागते. तारांकित प्रश्न मांडले जातात. आत्ता काम काही नाही. तारांकीत प्रश्न नाहीत त्यामुळे मी आलो नाही. या अधिवेशनात औचित्याचे मुद्दे उपस्थित करेन. जनतेचे प्रश्न मांडावेच लागतील. मला मंत्रिमंडळात ज्यांनी घेतलं नाही तेच उत्तर देऊ शकतील की मला मंत्री का केलं नाही. मला काही सांगता येणार नाही. मला मंत्रिमंडळात घेतलं जाणार नाही अशी जाणीव मला कुणी करुन दिली नाही. मी संघटनेवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मला प्रमोद महाजन यांचं वाक्य आठवतं आहे पावला-पावलावर मनाविरुद्ध घडत असताना जो काम पुढे नेतो तोच खरा कार्यकर्ता. हे वाक्य मी माझ्या मनात जपून ठेवलं आहे. असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. माझं देवेंद्र फडणवीस यांच्याशी आणि चंद्रशेखर बावनकुळेंशी बोलणं व्हायचं पण मी मंत्रिमंडळात नाही हे काही मला जाणवलं नाही. माझं नाव मंत्रिमंडळात आहे हे सांगण्यात आलं होतं असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मला दोन्ही नेत्यांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनीही नाव आहे हेच सांगितलं होतं”, असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis reaction on sudhir mungantiwar over not taking in the maharashtra cabinet sgk