Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 : राज्यातील १८ जिल्ह्यातील एकूण १ हजार ७९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आज (१७ ऑक्टोबर) जाहीर होत आहे. यासाठी ठिकठिकाणी मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीत एकूण ७४ टक्के मतदान झालं होतं. राज्यात शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकासआघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार आलं. यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतात यावरून कोणाची किती ताकद हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अनेकांचं या निवडणूक निकालाकडे लक्ष लागलं आहे. आतापर्यंत जवळपास ९०० ग्रामपंचायतींचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये भाजपाने दमदार कामगिरी केल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रया दिली आहे.

Andheri by election : “काहींनी समोरून विनंती केली तर काहींनी मागून; आता राजकारणात सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भात निकाल आम्ही मिळवलेला आहे. कुठे सरपंच निवडून आले, आमचे किती लोक निवडून आले. याची संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे. आम्ही कुठेही हवेत दावे करत नाहीत. मागील वेळी आपण बघितलं की सुरुवतीच्या काळात विविध दावे झाले, परंतु शेवटी आम्हीच नंबर वन ठरलो. आताही ८८९ ग्रामपंचायतींची माहिती आमच्याकडे आहे. या ८८९ पैकी ३९७ ठिकाणी म्हणजेच जवळपास ४०० ठिकाणी भाजपा निवडून आली आहे. आमच्यासोबत असलेली जी बाळासाहेबांची शिवसेना आहे ती ८१ ठिकाणी निवडून आली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना ८७ ठिकाणी निवडून आलेली आहे. काँग्रेस-१०४ ठिकाणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ९८ ठिकाणी आहे. अपक्ष ९५ ठिकाणी आहेत. याचा अर्थ असा आहे की, भाजपा पुन्हा एकदा सगळ्या मोठा पक्ष म्हणून निवडून आला आहे.”

पाहा व्हिडिओ –

Gram Panchayat Election Results 2022 LIVE : ‘या’ गावात सर्व अपक्ष जिंकले, सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार पराभूत

याशिवाय “बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा एकत्रितपणे महाविकास आघाडीच्या एकूण संख्येपेक्षा बरीच पुढे आहे. लोकांनी पुन्हा एकदा आमच्यावरच विश्वास दाखवला आहे. मागील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही आम्ही क्रमांक एकचा पक्ष होतो आणि आता पुन्हा आम्हीच क्रमांक एकचा पक्ष झालो आहोत. मी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांनी स्वत: या निवडणुकीत लक्ष घातलं होतं आणि संपूर्ण निकाल आल्यानंतर त्याची सगळी माहिती, आपल्यासमोर आम्ही ठेवणार आहोत.” असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

Story img Loader