Devendra Fadnavis Reaction on Sharad Pawar Appreciated RSS : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमतासह विजय मिळवला आहे. महायुतीच्या या विजयाचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देखील दिले जात आहे. महायुतीचे विरोधक व ज्येष्ठ नेते शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख) यांनी आरएसएसचं कौतुक केलं आहे. शरद पवार म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत संघाने प्रचाराची योग्य रणनीती आखली होती. त्यामुळे विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालं”. शरद पवारांनी संघाचे कौतुक केल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महायुती आणि शरद पवारांच्या पक्षात जवळीक वाढतेय का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री व भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राजकारणात काहीही होऊ शकतं. असं व्हावंच असं वाटत नाही, परंतु काहीही होऊ शकतं”.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा