नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बाल शौर्य पुरस्कार देण्याची भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे. यावरुन आता राजकीय वादंग निर्माण होताना दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. तसेच त्यांना जोरदार प्रत्युत्तरही दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केले, धर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म यांचे रक्षण केले. त्यांना औरंगजेबाने का मारलं? संभाजी महाराजांना धर्मांतर करण्यासाठी सांगितले गेले, पण त्यांनी मान्य केले नाही. स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्मासाठी हालअपेष्टा होऊन त्यांचे बलिदान झाले. त्यांच्या शरिराचे अक्षरशः तुकडे केले. तरी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वधर्म, स्वराष्ट्राची भाषा सोडली नाही. म्हणून अजित पवार आणि त्यांच्या विचारांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक तर होतेच पण ते धर्मवीर देखील होते.”

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

विधानसभेत बोलत असताना अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणई घातलं जात नाही. बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर… धर्मवीर… उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा”, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.

हे ही वाचा >> “सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजीराजे हे स्त्रीलंपट…”, जितेंद्र आव्हाडांचं खळबळजनक ट्वीट

राज्याच्या प्रशासनाचे इन्फेक्शन दूर झालं

महाराष्ट्राच्या प्रशासनाला जे इन्फेक्शन झालं होतं, ते दूर करण्याचे काम शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारने केले आहे. शासन-प्रशासन आता उत्तम काम करत असून अनेक चांगले निर्णय घेण्यात आले आहेत. २०२३ मध्ये महाराष्ट्राला वेगाने विकास पथावर नेण्याचे काम आमचे सरकार करेल, अशी प्रतिक्रिया यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हे ही वाचा >> ‘संभाजी महाराज धर्मवीर नव्हते’ म्हणणाऱ्या अजित पवारांवर संभाजीराजे संतापले; म्हणाले “विकृत…”

यावेळी शरद पवारांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. “शरद पवार यांच्या वक्तव्यावर मला बोलायचं नाही. त्या विषयात ईडी किंवा सीबीआय बोलेल. शरद पवार यांनी नरेटीव्ह तयार करायच्या आधी अनिल देशमुख यांच्या जामीनाबद्दल कोर्टाचे आदेश वाचावेत. मग नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करा, मग तुमच्या लक्षात येईल कोर्टाने काय म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis reply to ajit pawar comment on dharmaveer sambhaji maharaj kvg