Devendra Fadnavis : औरंगजेब क्रूर शासक नव्हता म्हणणाऱ्या अबू आझमींवर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली. यासाठी आज चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव सभागृहात एकमुखाने मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी औरंगजेब, त्याचे गोडवे गाणारे लोक यांच्याबाबत रोखठोक भूमिका मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या लोकांवर आजच निलंबनाची कारवाई झाली आहे. मी नीट विचार केला तर मला हे वाटतं की औरंगजेबाबाबत जे बोलतात ते काही मूर्ख नाहीत. आपल्याला त्यांचं बोलणं असंवेदनशील वाटतं ही बाब खरी आहे. पण बोलणारे लोक जाणीवपूर्वक बोलतात. कारण त्यांना त्यांची व्होट बँक वाचवायची आहे. कारण जगाला माहीत आहे की औरंगजेबाने हिंदूंची मंदिरं तोडली, हिंदूंवर कर लावले. सर्वात वाईट गोष्ट काय? तर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करुन मारलं. छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्याविषयी हे म्हटलं जातं की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी, परमप्रतापी एकही शंभू राजा था.” असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

औरंगजेब मुस्लिमांचाही हिरो होऊ शकत नाही-फडणवीस

औरंगजेबाशी छत्रपती संभाजी महाराजांनी ९ वर्ष लढा दिला. त्यातली एकही लढाई ते हरले नाहीत. संभाजी महाराजांना कपट करुन औरंगजेबाने पकडलं, त्यानंतर ज्या क्रौर्याने त्याने संभाजी महाराजांना मारलं भारतातले हिंदू नाही तर मुस्लिमांसाठीही औरंगजेब कधीही हिरो असू शकत नाही. आपल्या देशात एक परंपरा आहे. राम, कृष्ण, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावांवरुन अनेकजण आपल्या मुलांची नावं ठेवतात. मला तुम्ही औरंगजेब नावाचा मुलगा आहे का? आत्ता दाखवा. मुस्लिमांचाही औरंगजेब हा नायक होऊच शकत नाही. अशावेळी औरंगजेबाचे गोडवे गाण्यामागे त्यांचा हा विचार आहे की समाजवादी पार्टी ही उत्तर प्रदेशातही निवडणूक लढणार आहे. त्यांना वाटतं की लांगुलचालनाचं राजकारण केलं तर आपल्याकडे व्होट बँक तशीच राहिल. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी जे उत्तर प्रदेशात केलं त्यांना वाटतं की हेच परत होऊ शकतं. मात्र त्याचा काहीही परिणाम होणार नाही. असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले. टीव्ही ९ च्या कॉनक्लेव्हसाठी देवेंद्र फड

अखिलेश यादव यांना आवाहन करतो…

अखिलेश यादव हे काय म्हणाले मला माहीत नाही मात्र मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी सांगावं की त्यांचे पूर्वज आणि ते स्वतः छत्रपती शिवरायांना मानणारे आहेत? की त्यांना औरंगजेबाचे वारस असं स्वतःला म्हणवून घ्यायचं आहे. जे औरंगजेबाचा वारसा सांगतात तेच लोक असं काहीतरी बोलू शकतात. त्यांच्या रक्ताच्या एका थेंबातही जर छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आदर असेल तर ते असं वक्तव्य करुच शकत नाहीत.

कोरटकरला शिक्षा होणारच-फडणवीस

लोकशाही मार्गाने जो उपाय अबू आझमींबाबत करायचा तो आम्ही केला. त्यापुढे काही करायचं असेल तर ते काही आम्ही टीव्हीवर सांगून करणार नाही. कोरटकरच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांचा आणि आमचा काय संबंध? तो माणूस पत्रकार आहे, तो सगळ्याच नेत्यांसह फोटो काढतो. त्यांनी जे केलं तो मूर्खपणा आहे, त्यांना माफ करण्याचा काही प्रश्नच येत नाही. पण जे काही झालं आहे त्यामुळे त्यांना शिक्षा होईल असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.