Devendra Fadnavis :महाराष्ट्राच्या निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. या निवडणुकीत काय होणार ते २३ नोव्हेंबरला समजणार आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना आहे. आम्ही १८० पेक्षा जास्त जागून जिंकून येऊ असं महाविकास आघाडीने म्हटलं आहे. तर दुसरीकडे आमचं सरकार येईल असा विश्वास महायुतीने व्यक्त केला आहे. त्यामुळे काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महायुतीसमोर व्होट जिहाद ही एकच समस्या आहे असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो नारा दिला आहे की एक है तो सेफ है तो योग्यच आहे. भारत जोडो नावाचा एक समुदाय तयार करण्यात आला. त्यातले लोक भारत जोडोसाठी नाही तर देश तोडण्याचं काम करत आहेत. आपला देश जात, धर्म यात जेव्हा वाटला गेला तेव्हा गुलाम झाला. त्यामुळे बटेंगे तो कटेंगे हा देशाचा इतिहास आहे यात आक्षेपार्ह काहीही नाही असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे. महायुतीसमोर फक्त व्होट जिहाद हीच समस्या आहे असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले आहेत.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण

मोदींना हरवण्यासाठी लोकांना शपथा घ्यायला लावल्या, ही कुठली धर्मनिरपेक्षता?

कुठल्याही एका उद्देशाने एकत्र येत आहात तर चांगली गोष्ट आहे. मात्र लोकसभेत व्होट जिहाद पाहण्यास मिळाला. धर्मस्थळांवर मतं द्या म्हणून बॅनर लावण्यात आली. महाविकास आघाडीला मत दिलं नाही तर अल्लाशी बेईमानी होईल सांगण्यात आलं. मी तमाम सेक्युलरवाद्यांना सवाल आहे ही कुठली धर्मनिरपेक्षता आहे? लोकांना शपथा घ्यायला लावल्या. त्याचा उद्देश काय? मोदींना हरवणं इतकंच. कुठल्या हिंदू पुजाऱ्यांनी सांगितलं की भाजपाला मतं द्या नाहीतर रामाशी, देवाशी बेईमानी होईल ? लोकसभेनंतर जी परिस्थिती तयारी झाली होती ती आता नाही. असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलंं आहे.

हे पण वाचा- BJP : ‘लव्ह जिहाद’ ते ‘व्होट जिहाद’, ‘रझाकार’ ते ‘हिंदुत्व’ भाजपाने विधानसभा निवडणुकीत कुठले मुद्दे आणले?

उलेमांचे तळवे चाटण्याचं काम महाविकास आघाडी करते आहे-फडणवीस

महाविकास आघाडी मुस्लिम उलेमांचे तळवे चाटण्याचं काम करते आहे. त्यातली एक मागणी अशी आहे की २०१२ ते २०२४ या कालावधीत ज्या दंगली झाल्या त्यात मुस्लिमांवर जे गुन्हे आहेत ते मागे घेतले जातील ही मागणी यात करण्यात आली आहे. आता माझा प्रश्न आहे की हे कुठलं राजकारण आहे? दंगलखोरांना बरोबर घेऊन महाविकास आघाडी लढत असेल तर आम्ही बटेंगे तो कटेंगे ही घोषणा दिली त्यात गैर काय? असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.

धर्मयुद्ध ही घोषणा का दिली? देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर

धर्मयुद्ध अशी घोषणा का दिली? असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की सत्य तिथे विजय हे आपला धर्म सांगतो आहे. त्यामुळे हे आमचं धर्मयुद्ध आहे. जे लोक खोटं बोलत आहेत त्यांच्याविरोधात आमचं धर्मयुद्ध आहे. आम्ही निवडणूक लढत आहोत तरीही ही बिनाशस्त्राची लढाई आहे. समोरचे लोक बेईमानी कऱणार आणि आम्ही बघत बसणार असं होणार नाही असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.

Story img Loader