Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी व्होट जिहादचा मुद्दा उपस्थित केला होता. लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह आणि व्होट जिहाद हे मुद्दे चालले त्यामुळे आम्ही अनेक जागांवर निवडून आलो नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. याबाबत नाना पटोले म्हणाले की भाजपा आणि देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) हे हिंदू मतांचा जिहाद करतात. संजय राऊत यांनीही ही टीका याबाबत केली आहे. हिंदू व्होट जिहाद बाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी हिंदुत्वात जिहाद हा शब्दच नाही असं म्हटलं आहे.

महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवत आहोत. आम्हाला मुख्यमंत्री कोण असणार हे विरोधक कसं काय विचारतात? आमच्याकडे तर चेहरा आहे. महाविकास आघाडीने चेहरा जाहीर करावा पुढच्या पंधरा मिनिटांत आम्ही आमच्याकडून कोण चेहरा आहे ते सांगू असं खोचक उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार? ते दोन पक्षांचे अध्यक्ष आणि आमचं संसदीय मंडळ हे मिळून चेहरा ठरवतील. सगळे त्या नावाला पाठिंबा देतील. असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

Mohol Constituency Politics
Mohol Constituency Politics : मोठी बातमी! शरद पवारांनी मोहोळमध्ये उमेदवार बदलला; सिद्धी कदम यांच्याऐवजी ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
devendra fadnavis marathi news
“महाराष्ट्रात आम्ही अतिआत्मविश्वासात होतो”, देवेंद्र फडणवीसांनी केलं मान्य; ‘या’ दोन कारणांचा केला उल्लेख!
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
Shaina NC vs Atul Shah
Shaina NC vs Atul Shah: ‘निवडणूक म्हणजे संगीत खुर्ची आहे का?’, शायना एनसींना उमेदवारी मिळताच भाजपाचे ज्येष्ठ नेत्याचे बंड; अपक्ष उमेदवारी दाखल करणार
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
devendra fadnavis reaction on harshwardhan patil about join ncp sharad pawar group
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “आर. आर. आबा आता हयात नाहीत, पण एवढंच सांगतो की…”, देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांच्या दाव्यावर उत्तर!

हे पण वाचा- “महाराष्ट्रात आम्ही अतिआत्मविश्वासात होतो”, देवेंद्र फडणवीसांनी केलं मान्य; ‘या’ दोन कारणांचा केला उल्लेख!

आम्ही कुठलाही फॉर्म्युला ठरवलेला नाही

आम्ही कुठलाही फॉर्म्युला सध्या ठेवलेला नाही. आम्ही तीन पक्ष एकत्र बसू आणि निर्णय घेऊ. स्ट्राईक रेट किंवा इतर काही थिअरी चालत आहेत त्याला काहीही अर्थ नाही. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाजपा हा असा पक्ष असा आहे ज्यात व्यक्ती किंवा नेता निर्णय घेत नाही. आमचं मंडळ निर्णय घेतं. माझ्या पक्षाने मला दिल्लीत जायला सांगितलं दिल्लीत जाईन, महाराष्ट्रात थांबायला सांगितलं तर महाराष्ट्रात थांबेन, घरी जायला सांगितलं तर घरी जाईन. देवेंद्र फडणवीस आपल्या मनाने काम करत नाही पक्षाचं काम करतो. मी पाच वर्षे मुख्यमंत्री होतो तरीही मी उपमुख्यमंत्री झालो. आमच्यासाठी आमचं अस्तित्व नाही. आमच्यासाठी आमचं अस्तित्व म्हणजे आमचा पक्ष भाजपा आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी हे विधान केलं आहे.

हिंदुत्वात जिहाद हा शब्दच नाही.

हिंदू शब्दासह जिहाद हा शब्द जोडलाच जात नाही. कारण हिंदुत्वात जिहाद हा शब्दच नाही. हिंदुत्वाचा अर्थ सहिष्णुता आहे. हिंदु तत्व आपल्या देशात आहे, ते सहिष्णु आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाचे लोक सुरक्षित आहेत. तुम्ही मुस्लिम बांधवांना विचारलं तर ते तुम्हाला सांगतील की पाकिस्तानापेक्षा जास्त आम्हाला भारतात सुरक्षित वाटतं. तसंच आम्ही प्रगती करत आहोत आमच्यासह कुठलाही भेदभाव केला जात नाही. मला हे वाटतं की या ठिकाणी जो व्होट जिहाद झाला तसा हिंदूंनी करायचं ठरवलं असतं तर या देशाचा चेहराच बदलला असता. हिंदू कायम सहिष्णू असतात. त्यामुळेच आपला देश सेक्युलर आहे. हिंदुत्वामुळे सेक्युलारिझम आणि लोकशाही देशात जिवंत आहे. असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

Story img Loader