शिवसेना पक्षातील अभूतपूर्व अशा बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झाले. तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राजीनामा द्यावा लागला. सध्या राज्यात सत्तापालट झाले असून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सत्ताशकट हाकत आहेत. याआधी विरोधी पक्षात असलेले देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला सातत्याने लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरे नेतृत्व करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने भाजपा-शिवसेना युती सरकारच्या योजना बंद केल्याचाही आरोप फडणवीस यांनी यापूर्वी अनेकवेळा केला आहे. मात्र आता सत्तेत आल्यानंतर ठाकरे सरकारला दोष देणार नाही. राज्याच्या विकासासाठीचे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याचा प्रण केला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा