Devendra Fadnavis on Justice Chandiwal claims : अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या खंडणीचं टार्गेट दिल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर याप्रकरणी चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. त्या समितीचा अहवाल सादर करण्यात आलेला नाही. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या अहवालाची मागणी केली होती. मात्र हा अहवाल समोर आलेला नाही. अशातच निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल यांनी एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांनी देवेंद्र फडणवीस यांना एका प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला होता असं चांदिवाल यांनी म्हटलं आहे. यावर आता स्वतः फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, “मला त्या सगळ्याची कल्पना आहे. त्या लोकांनी (देशमुख व वाझे) मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला होता”.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा