शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (१० जुलै) नागपूर येथे एका भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. टीका करत अताना उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना ‘कलंक’ म्हटलं होतं. त्यावरून राज्यातलं राजकारण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे. भाजपा कार्यकर्ते सकाळपासूनच आंदोलनं करत आहेत. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांना तीव्र आणि आक्रमक आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कलंक या शब्दामुळे राज्यातलं वातावरण तापलेलं असताना उद्धव ठाकरे यांनी आज (११ जुलै) दुपारी पत्रकार परिषदेत बोलताना ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरे म्हणाले, मी भाषणात कलंक हा शब्द वापरला त्यात चुकीचं काय बोललो? तुम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि नंतर त्यांनाच मंत्रिमंडळात घेतलंत. मी वापरलेला कलंक हा शब्द इतका प्रभावी आहे असं वाटलं नव्हतं. आरोप करताना जनाचं नाही किमान मनाचं भान ठेवा. मी अफझल खानाची स्वारी असंही म्हटलं होतं. पण त्यामागे माझा हेतू हा होता की ईडी (अंमलबजावणी संचालनालय), सीबीआय आणि आयकर हे जे काही घराघरात घुसवत आहात त्याचा अर्थ काय आहे? ती कुटुंबं कलंकित होत नाहीत का? मी एक शब्द वापरला तर तुमची तळपायाची आग मस्तकात का गेली?

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Image of protesters at the MCG
Boxing Day Test : बॉक्सिंग डे कसोटीत खलिस्तान्यांचा राडा, भारतीय प्रेक्षकांनी दिले जशास तसे उत्तर
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या टीकेला भाजपा नेते, पदाधिकारी उत्तर देत होते. आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, खरं म्हणजे मला या गोष्टीचं अत्यंत दुःख आहे की, आमचे आजचे विरोधक आणि माजी मित्र यांच्यावर आताच्या राजकीय परिस्थितीचा फारच विपरित परिणाम झाला आहे असं दिसतंय. त्यामुळे त्यांना मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

अशा मानसिकतेतून एखादी व्यक्ती बोलत असेल तर मला वाटतं की त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. कारण त्यांची मानसिक स्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. त्यांच्या मानसिक स्थितीवर, व्यवहारावर मला दया येतेय. त्यांनी एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाकडे जायला हवं.

Story img Loader