राज्यात एकीकडे सत्ताधारी शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत. विरोधकांकडून सरकार अल्पकाळ टिकेल असे दावे केले जात आहेत. तर दुसरीकडे पुढील वर्षी राज्यात होणाऱ्या विधानसभा आणि देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे वेध सर्वपक्षीयांना लागले आहेत. सर्वच पक्षांनी त्या दिशेनं नियोजन करायला सुरुवात केली आहे. आघाडी-युतीची चर्चा सुरू झालेली असताना मुख्यमंत्रीपदाच्या चेहेऱ्यांचीही चर्चा पाहायला मिळत आहे. यात भाजपा-शिंदे गट युतीच्या मुख्यमंत्रीपदावरून अनेक तर्क लावले जात आहेत.

एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली निवडणुका!

एकीकडे भारतीय जनता पक्षानं पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे तर्कानुसार एकनाथ शिंदेच युतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणं अपेक्षित आहे. मात्र, त्यासंदर्भात अद्याप युतीमध्ये स्पष्ट भूमिका ठरली नसल्याचंच चित्र देवेंद्र फडणवीसांनी नुकत्याच केलेल्या विधानामुळे निर्माण झालं आहे. शिंदे गटासोबत भाजपानं युती करून स्थापन केलेलं सरकार आणि शिंदेंना दिलेलं मुख्यमंत्रीपद हा तात्कालिक निर्णय होता, अशी चर्चा रंगत आहे. त्यामुळे पुढील वर्षी युतीकडून ‘वेगळा निर्णय’ होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे!

ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Pusad Naik family, Indranil Naik , Vasantrao Naik,
अजित पवारांसोबत गेलेल्या नाईक घराण्याला मंत्रिपदाची भेट ?
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीसांनी रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भात केलेल्या विधानांमुळे चर्चेला उधाण आलं आहे. याआधी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वगुणांविषयी ठाम भूमिका मांडणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याबाबत पक्षातील वरीष्ठ निर्णय घेतील, अशी भूमिका मांडली.

“उपमुख्यमंत्रीपद हा माझ्यासाठी धक्का होता, कारण…”, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं ‘त्या’ वेळी नेमकं काय घडलं?

“कोणत्याही पक्षाला आणि कार्यकर्त्याला हेच वाटत असतं की आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा. पण २०२४ ची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच आम्ही लढवू. जो मुख्यमंत्री असतो, तोच सरकारचा नेता असतो, त्याच्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातात”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

“त्यावेळी पक्षाला वाटलं, तर वेगळा निर्णय घेईल”

मात्र, नेत्याच्या नेतृत्वात निवडणुका लढवणं आणि निवडणुकांनंतर त्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी बसवणं या दोन वेगळ्या गोष्टी असतात अशी विचारणा करण्यात आल्यानंतर फडणवीसांनी त्यावर सूचक प्रतिक्रिया दिली. “जर त्या वेळी आमच्या पक्षाला कोणता दुसरा निर्णय घ्यायची गरज असेल, तर पक्ष तो निर्णय घेईल. पण मला वाटत नाही की दुसरा कुठला निर्णय घेण्याची गरज आहे”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

“कोण मुख्यमंत्री असेल, हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना विचारायला हवं. भाजपामध्ये सगळे निर्णय संसदीय समिती घेते. यासंदर्भात काही बोलण्याचाही अधिकार मला नाहीये”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मी आहे तिथे खूश आहे”

“पाच वर्षं मुख्यमंत्री असताना मी खूप काम केलंय. मी ज्या जागी आहे, तिथे खूश आहे. माझ्यासाठी तर पक्षाला पुन्हा निवडून आणणं याला प्राधान्य आहे. नेता कोण कधी बनेल यावर पक्ष निर्णय घेईल. मला मोदींनी मुख्यमंत्री केलं, तेव्हा पक्षात इतरही अनेक लोक होते. पण मोदींना वाटलं की मी चांगलं काम करू शकेन म्हणून त्यांनी मला मुख्यमंत्री केलं”, असंही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी नमूद गेलं.

Story img Loader