Devendra Fadnavis on Girish Mahajan Jamner Assembly Candidature : मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातील नेरी येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. शुक्रवारी (११ ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी जामनेरकरांसमोर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजनांना उमेदवारी देणार नाही. तसेच, यंदाच्या निवडणुकीत गिरीश महाजन यांनी केवळ उमेदवारी अर्ज दाखल करावा आणि महाराष्ट्रभर भाजपासह महायुतीचा प्रचार करावा. त्यानंतर थेट मतदानाच्या दिवशी मतदारसंघात यावं. जामनेरकरांनी त्यास पाठिंबा द्यावा”.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं हे ३५० वं वर्ष आहे. या निमित्ताने जामनेर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा राहिला आहे. हा पुतळा आम्हाला स्वातंत्र्य काय असतं, स्वराज्य काय असतं, स्वाभिमान काय असतं ते दाखवून देत राहील. तसेच ज्यांनी आम्हाला समता आणि बंधुता शिकवली, जगातील सर्वोत्तम संविधान आम्हाला दिलं, त्या बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा येथे तयार झाला आहे. हा पुतळा आम्हाला बाबासाहेबांच्या शिकवणीची आठवण करून देत राहील. हे दोन पुतळे उभारल्याबद्दल मी जामनेरकरांनो तुमचं आणि मंत्री गिरीश महाजन यांचं मनापासून अभिनंदन करतो. यासह अनेक लोकोपयोगी कामांचं आज या ठिकाणी लोकार्पण होत आहे त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो”.

Approval of the tender of Rs 47 lakh 27 thousand for the statue of Sambhaji Maharaj
डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत महापालिकेने घेतला मोठा निर्णय!
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
Five youths attempted self immolation in Abdul Sattar office Chhatrapati Sambhajinagar news
छत्रपती संभाजीनगर: मंत्री सत्तारांच्या कार्यालयात पाच तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न
statue of Chhatrapati Shivaji Maharaj, statue Shivaji Maharaj in Rajkot,
राजकोट येथील छत्रपतींच्या नव्या पुतळ्याची जबाबदारी सुतारांकडे – दीपक केसरकर
mahayuti erect and unveil chhatrapati shivaji maharaj statue across maharashtra ahead of assembly election
निवडणुकीच्या तोंडावर राजकारण्यांना शिवप्रेमाचे भरते ;छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारण्याचा सपाटा
Rahul Gandh
Rahul Gandhi : राहुल गांधी दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार, संविधान सन्मान संमेलनाला उपस्थिती
Malvan, Badlapur, statue of Shivraji Maharaj,
शिवरायांच्या पुतळ्याबाबत बदलापुरात मालवणची पुनरावृत्ती ?
Bhaskar Jadhav Shivaji maharaj
भ्रष्ट लोकांच्या हातून पुन्हा शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी नको – भास्कर जाधव

हे ही वाचा >> OTT प्लॅटफॉर्म्सवर सरसंघचालक मोहन भागवतांचा तीव्र आक्षेप; म्हणाले, “जे सांगणंही अभद्र ठरेल इतकं बीभत्स…”

“२०२९ मध्ये आम्ही गिरीश महाजनांना तिकीट देणार नाही”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या कार्यक्रमाला येण्यामागे माझा एक स्वार्थ देखील आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की गिरीश महाजन हे आमचे संकटमोचक आहेत. आता काही लोक म्हणत आहेत की गिरीश महाजन यांना आम्ही जामनेरमध्येच पाडणार. परंतु, हे अशक्य आहे. या मतदारसंघात गिरीश महाजन यांच्यापेक्षा जास्त मतं येऊ शकेल अशी एकच व्यक्ती आहे, ती व्यक्ती म्हणजे आमच्या साधना वहिनी (मंत्री गिरीश महाजन यांचा पत्नी). आम्ही साधना वहिनींना या मतदारसंघात उभं केलं तर त्यांना गिरीश महाजनांपेक्षा जास्त मतं मिळतील. त्यामुळे मी गिरीश महाजन यांना आज एक गोष्ट सांगेन. तुम्ही यावेळी लढून घ्या. परंतु, २०२९ मध्ये साधना वहिनीच या मतदारसंघातून निवडणूक लढवतील, तेव्हा आम्ही गिरीश महाजन यांना तिकीट देणार नाही”.