Devendra Fadnavis School Memories : भाजपाचे तरुण तडफदार नेते देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी वर्णी लागली आहे. ते उद्या होणाऱ्या शपथविधीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ते राज्याचे २१ वे मुख्यमंत्री असणार असून आतापर्यंत त्यांनी तीनवेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसंच, विदर्भातील ते चौथे मुख्यमंत्री ठरले आहेत. दरम्यान, शाळेत मृदूभाषी असलेले देवेंद्र फडणवीस पुढे जाऊन राजकारणात शिरतील असं त्यांच्या शिक्षकांनाही वाटलं नव्हतं. तसंच, शेवटच्या बाकावर बसलेला विद्यार्थी राज्याच्या महत्त्वाच्या खूर्चीवर विराजमान होत असल्याने त्यांच्या शाळेतील शिक्षकांनी आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे. शाळेच्या पुष्पा अनंत नारायण या शिक्षिकेने आज एबीपी माझाशी संवाद साधला.

देवेंद्र फडणवीसांचं प्राथमिक शिक्षण शंकरनगरातील सरस्वती विद्यालयात झालं आहे. ते शाळेत शेवटच्या बाकावर बसायचे. पण यामागेही त्यांची सामाजिक वृत्तीच होती. त्यांच्या भारदस्त शरीरयष्टीमुळे मागच्या विद्यार्थ्यांना फळ्यावरचं नीट दिसावं याकरता ते स्वतः मागच्या बाकावर बसायचे असं त्यांच्या शिक्षिका म्हणाल्या. शिक्षिका पुष्पा नारायण म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस याच बाकावर बसायचे. तेव्हाही त्यांची शररीयष्टी अशीच डायनॅमिक होती. तेव्हाही ते थोडे उंच आणि भारदस्त होते. तेव्हापासूनच ते सामाजिक विचार करत होते. माझ्यामुळे कोणाला अडचण येऊ नये म्हणून ते मागे जाऊन बसायचे. शेवटच्या बाकावर बसणारा विद्यार्थी कधी पुढे जात नाही ही कल्पनाही त्यांनी मागे टाकली.”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा >> शाळेत शेवटच्या बाकावर बसणारा देवेंद्र पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सर्वोच्च खुर्चीवर, शाळेतील विद्यार्थ्यानी सांगितल्या त्यावेळच्या आठवणी….

देवेंद्र फडणवीसांकडे लहानपणापासूनच नेतृत्त्वगुण होते का? असं विचारलं असता त्या म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस फार लाजाळू आणि मृदूभाषिक होते. ते फार कमी बोलत असत. त्यांना विचारलं तरच ते त्यांचं मत मांडत असतं. पण नक्कीच त्यांच्यात नेतृत्वगुण होते.” बाकाला आत्मकथा लिहायला सांगितली तर ते नक्कीच फडणवीसांचा उल्लेख करतील, असंही त्या पुढे म्हणाल्या.

शाळेतील विद्यार्थ्यांनीही जागवल्या आठवणी

देवेंद्र फडणवीस यांचे शालेय मित्र मुकुल बऱ्हानपुरे यांनी सांगितले, नागपूरच्या शंकर नगर चौकावरील साउथ इंडियन एजुकेशन सोसायटीच्या सरस्वती विद्यालयात आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होतो. शाळेतील तळ मजल्यावरच्या वर्गात शेवटून दुसऱ्या बाकावर तो बसत होता. अभ्यासात मागे आहे म्हणून त्याना अखेरच्या बाकावर बसावे लागत नव्हते. तर लहानपणी देवेंद्र फडणवीस यांची उंची ही जास्त होती. इतर मुलांच्या तुलनेत ते जास्त उंच असल्याने त्यांना शेवटच्या बाकावर बसावे लागत होते. शाळेत अत्यंत शांत, लाजाळू आणि कधी कधीच बोलणारे होते पण खोडकर होते. अभ्यास हुशात होते मात्र मात्र नियमित अभ्यास करत नसल्यामुळे शाळेतील शिक्षक त्यांना रागावत होते पण दुसऱ्या दिवशी मित्रा विचारुन गृहपाठ पूर्ण करत होते. ते शाळेत एखाद्या विद्यार्थ्याची खोड काढायचे आणि त्यानंतर त्यांची तक्रार केल्यानंतर शाळेतील शिक्षिका त्यावर विश्वास ठेवत नव्हतच्या. इतका साधा मुलगा खोडकर असून शकत नाही अशी शिक्षकांना सहानुभुती त्याला समोसा आवडत होता. त्यामुळे शाळेच्या बाहेर असलेल्या प्रिती कॉर्नर येथे जाऊन त्यावेळी आम्ही सोबत जाऊन समोसा खात होते. शाळेत त्यांचा मोठा भाऊ आशिष होता त्यामुळे भावाचा त्याला धाक होता. त्यामुळे तो शाळेत जास्त मस्ती करत नव्हता मात्र विद्यार्थ्याच्या खोड्या करत होत्या अशी आठवण त्यांनी सांगितली.

o

Story img Loader