महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनात आज (१५ डिसेंबर) भाजपा नेते आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नाशिकमधील पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांचे काही फोटो दाखवत त्यांच्यासह ठाकरे गटावर गंभीर आरोप केले. राणे यांनी बडगुजर यांचे १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीबरोबरचे कथित फोटो दाखवून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले. तसेच बडगुजर यांच्यावर कारवाईची मागणी केली.
नितेश राणे यांनी कारवाईची मागणी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनीदेखील ही गंभीर बाब असल्याचं वक्तव्य केलं. तसेच चौकशीची मागणी केली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, असं जाहीर केलं.
नितेश राणे म्हणाले, मुंबईत १९९३ ला ज्याने बॉम्बस्फोट घडवला त्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार सलीम कुर्ला हा जेव्हा पॅरोलवर बाहेर होता, त्याच्या पॅरोलच्या शेवटच्या दिवशी त्याने एका माणसाबरोबर पार्टी केली. तो माणूस म्हणजे उबाठा सेनेचा नाशिकचा महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर. सलीम कुर्लाने सुधाकर बडगुजरबरोबर पार्टी केली होती. माझ्याकडे दोघांचा फोटो आहे. दोघांचा पार्टीत नाचतानाचा व्हिडीओदेखील आहे. तो व्हिडीओ मी विधानसभा अध्यक्षांना पाठवला आहे.
दरम्यान, हा विषय शिवसेनेच्या शिंदे गटानेही लावून धरला. मंत्री दादा भुसे म्हणाले, दाऊद इब्राहिमचा उजवा हात अशी ओळख असलेला सलीम कुर्ला हा एक शार्प शूटर आहे, ज्याने मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले होते. तो नाशिकमध्ये पोट भरायला, कामधंद्यासाठी आला होता आणि आज शेकडो कोटी रुपयांचा मालक झाला आहे. उबाठा सेनेचे नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर अशा देशद्रोह्यांबरोबर डान्स पार्टी करत असतील तर ही अतिशय गंभीर बाब आहे. त्याचबरोबर बडगुजर हा खूप छोटा मासा आहे. त्याच्यावर कोणाचा वरदहस्त आहे याच्या खोलात जाऊन चौकशी करण्याची गरज आहे.
हे ही वाचा >> “पोलिसांनीच मला पळवून लावलं”, ललित पाटीलच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत स्पष्टीकरण, म्हणाले…
दरम्यान, याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. फडणवीस म्हणाले, देशाचा शत्रू दाऊद इब्राहिमच्या सहकाऱ्याबरबोर पार्टी करणाऱ्या या व्यक्तीची चौकशी केली जाईल. या दोघांचे काय संबंध आहेत ते तपासलं जाईल. मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल.