Devendra Fadnavis Speech in Vidhan Sabha: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल लागल्यापासून विरोधी पक्षांकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. ईव्हीएमसंदर्भात विरोधकांनी सत्ताधारी महायुतीमधील तिन्ही पक्षांवर केलेल्या आरोपांमध्ये सर्वात महत्त्वाचा आरोप होता तो म्हणजे मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ नंतर आलेलं अतिरिक्त ७६ लाखांचं मतदान कसं झालं? खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती डॉ. परकला प्रभाकर यांनीही या अतिरिक्त ७६ लाख मतांबाबत संशय व्यक्त केला होता. या सर्व मुद्द्यांवर आज महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“विधानसभा निवडणुकीत मतदार होते ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९. यापैकी मतदान झालं ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९६. म्हणजे ६६.५ टक्के. सकाळी ७ ते ९ यादरम्यान ६.६१ टक्के म्हणजे ६४ लाख १३ हजार ३६०. सकाळी ९ ते ११ मध्ये ११.५३ टक्के. म्हणजे १ कोटी ११ लाख ८६ हजार ९९६ मतं. सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान १४ टक्के मतदान झालं. म्हणजे १ कोटी ३६ लाख २२ हजार ३२७. दुपारी १ ते ३ मध्ये १३.३५ टक्के. म्हणजे १ कोटी २९ लाख ५२ हजार ८५३. दुपारी ३ ते ५ दरम्यान १२.६९ टक्के मतदान झालं. म्हणजे १ कोटी २३ लाख १२ हजार ४८८. संध्याकाळी ५ ते ६ या वेळात ६ पूर्वी जेवढे लोक रांगेत उभे राहतात, त्या सगळ्यांना आपण मतदान करू देतो. अनेक ठिकाणी रात्री ८ पर्यंत मतदान चालतं. या वेळेत ७५ लाख ९७ हजार ०६७ लोकांनी मतदान केलं. महाराष्ट्रात एक लाख मतदान केंद्र आहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी ७५ लोकांनी मतदान केलं आहे. ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान झालं. अंतिम आकडेवारी आली ६६ टक्के. म्हणजे ७.८३ टक्क्यांनी मतदान वाढलं”, असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी सविस्तर आकडेवारी मांडली.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “कधी कधी काही घटना घडतात, पण…”; मुंबईत सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
Devendra Fadnavis talk about his political career in BJP and about RSS
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबुली, म्हणाले, “संघ स्वंयसेवकाला आदेश पाळायचा असतो, तेच मी केले म्हणून भाजपमध्ये…”
CM Devendra Fadnavis Nagpur Interview
Devendra Fadnavis : कठोर राजकारणी कोण मोदी की अमित शाह? देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं?
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
Sudhir Mungantiwar absent chandrapur Chief minister Devendra Fadnavis program
निमंत्रण पत्रिकेमध्ये शेवटी नाव…. अपमान झाल्याने मुनगंटीवारांनी फडणवीसांच्या…..
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आम्ही ‘वार’ आडनाव असलेल्यांचा सन्मान करतो, कारण…”, मुनगंटीवार, वडेट्टीवारांचा उल्लेख करत फडणवीस काय म्हणाले?

आकडेवारीचं स्पष्टीकरण काय?

या आकडेवारीचं विरोधकांच्या आरोपांनुसार देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरणही दिलं. “सरासरी प्रत्येक तासाला ५.८३ टक्के मतदान झालं आहे. सरासरी ताशी मतदान जवळपास ६० लाखांचं आहे. प्रतिमिनिट मतदान जवळपास ९७ हजार १०३ इतकं आहे. याचा अर्थ एकूण विचार करता ६ वाजेनंतरच्या मतदानाचा हिशेब लावला तर ते फक्त १७ लाख इतकं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मारकडवाडीबाबत शरद पवारांना केलं लक्ष्य

निवडणूक निकालांनंतर मारकडवाडी ग्रामस्थांनी केलेला पेपरवरील मतदानाचा प्रयत्न प्रशासनाने बंद पाडला. त्यावरून बराच गदारोळ झाला. त्यावर फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यासंदर्भात त्यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे. “मला बाकी कुणाचं आश्चर्य वाटलं नाही. मला फक्त शरद पवारांचं आश्चर्य वाटलं. कारण शरद पवार देशातले अत्यंत तटस्थ नेते आहेत. याआधी काँग्रेसनं अनेकदा ईव्हीएमचा मुद्दा मांडला. पण शरद पवारांनी तो कधीच मांडला नाही. यावेळी मात्र शरद पवारांनी पहिल्यांदाच नवीनच लॉजिक आणलं. ते म्हणाले की ईव्हीएमचं सेटिंग असं झालंय की छोटी राज्य विरोधक जिंकतात आणि मोठी राज्य आम्ही जिंकतो. कर्नाटक, पश्चिम बंगाल छोटं राज्य आहे का? आता काँग्रेसवालेही एकटे पडले आहेत. कारण परवा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की ईव्हीएमवर बोलणं सोडून द्या. ममता दीदींनीही हाच सल्ला दिला”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसलाही टोला लगावला.

“लोकशाहीत दादागिरी खपवून घेतली जाणार नाही”

“राम सातपुतेंसारखा सर्वसामान्य कार्यकर्ता पाच वर्षं राबतो आणि एकट्या मारकडवाडीत २२ कोटींची कामं करतो. पण त्याला जास्त मतं मिळाल्यावर तुम्ही लोकांना जाऊन धमकावता? तिथे लोकांना धमकावण्यात आलं की बॅलेटवर मतदान घ्यायचं आणि मत मिळायला हवं राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला. ही कोणती लोकशाही आहे? जिथे मतं मिळत नाहीत, तिथे जाऊन दादागिरी करायची? लोकशाहीत दादागिरी खपवून घेतली जाणार नाही”, अशा शब्दांत फडणवीसांनी विरोधकांना इशारा दिला.

“सध्या एक नवीन पद्धत रूढ झाली आहे. निकाल आपल्या बाजूने लागला तर जनतेचा कौल. लोकशाहीचा विजय. आणि निकाल विरोधात गेला तर ईव्हीएम, निवडणूक आयोग, लोकशाहीचा खून असं म्हटलं जातं. जे संविधान घेऊन आपण फिरतो, त्या संविधानावर दाखवलेला हा अविश्वास आहे. या संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर अविश्वास तयार करण्यासारखा हा प्रकार आहे”, असं फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis Video: लाडकी बहीण योजनेसाठी निकष बदलणार का? देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत मोठं भाष्य; म्हणाले, “एखादी योजना जर…”

आयोगाविरोधात जनमत तयार करणं हा राजद्रोह – देवेंद्र फडणवीस

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक आयोगाविरोधात जनमत तयार करणं हा राजद्रोह असल्याचं मत मांडलं. “सर्वोच्च न्यायालयाने राजद्रोहाचा अर्थ असा दिलाय की संविधानानं ज्या संस्था तयार केल्या आहेत, त्यांच्याविरुद्ध जनमत तयार करणं, त्या संस्था चुकीच्या आहेत असं सांगणं हा राजद्रोह सांहितला आहे. आज आपण रोज ते काम करत आहोत. हे अयोग्य आहे”, असं ते म्हणाले.

Story img Loader