Maharashtra Budget Session 2022 : नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वीच ईडीनं अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपानं लावून धरली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देखील नवाब मलिकांच्या राजीनाम्याशिवाय कामकाज चालू देणार नाही, असं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या प्रकरणाचे पडसाद दिसून आले. विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. हा असा काही प्रकार इतिहासात पहिल्यांगदाच घडत असल्याचं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

“इतिहासात असं कधीच घडलं नाही”

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून विरोधकांनी विधानसभेत कामकाज सुरू होताच गोंधळ घालायला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीसांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. “इतिहासात असं कधीही घडलं नाही. राज्याचे एक मंत्री दाऊदसोबत व्यवहार केल्याचा, हसीना पारकरला पैसे दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मुंबईत जे बॉम्बस्फोट झाले, त्या स्फोटाच्या आरोपींसोबत व्यवहार करून हसीना पारकरला पैसे देऊन हे काम झालं आहे. त्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आहे. असं असताना एखादा मंत्री मंत्रीपदावर राहातो, हे नैतिकतेला धरून नाही”, असं फडणवीस म्हणाले.

Supriya Sule On Mahayuti
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “भाजपमध्ये फिफ्टी-फिफ्टी मतभेद, फडणवीस एक सांगतात तर…”, सुप्रिया सुळेंची खोचक टिप्पणी!
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
devendra fadnavis in kalyan east assembly constituency election
कल्याण : विषय संपल्याने रडारड करणाऱ्यांपेक्षा लढणाऱ्यांच्या पाठीशी रहा; देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
Shahajibapu Patil
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “बिन कामाचा रे बिन कामाचा, अडीच वर्ष…”, शहाजी बापू पाटील यांनी केली उद्धव ठाकरेंची मिमिक्री
Prime Minister Narendra Modi and Union Home Minister Amit Shah in the state of Maharashtra to campaign for the assembly elections
नरेंद्र मोदी, अमित शहा आजपासून राज्यात; पंतप्रधानांच्या महाराष्ट्रात १० सभा
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : “महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ते लाडकी बहीण योजना..”, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
development
स्थगिती विरुद्ध प्रगती!
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ‘जे बाळासाहेबांचे झाले नाहीत, ते राज ठाकरेंचे काय होणार?’, राजू पाटलांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Maharashtra Budget Session 2022 : “ही लाज वाटण्यासारखी गोष्ट”, राज्यपालांनी अभिभाषण गुंडाळल्यानंतर आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका!

“त्यांनी मुंबईशी गद्दारी केली आहे”

“माननीय मुख्यमंत्री महोदय, आज जर हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते, तर एका मिनिटात त्यांना काढून टाकलं असतं. कारण त्यांनी मुंबईसोबत गद्दारी केली आहे. मुंबईचे अपराधी, ज्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट केला, अशा लोकांकडून फक्त जमीन घेतली असं नाही तर ५५ लाख रुपये हसीना पारकरला दिले. हसीना पारकर ही दाऊदची बहीण आहे. त्याच्या बहिणीला पैसे देणं म्हणजे त्यानंतर झालेल्या बॉम्बस्फोटात जे लोक सामील आहेत, त्यांना मदत करण्यासारखं आहे”, असं देखील फडणवीस म्हणाले.

Maharashtra Budget Session 2022 : अधिवेशनाला वादळी सुरुवात; सत्ताधारी आमदारांच्या घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी दोन मिनिटांत भाषण गुंडाळलं!

“कुणाच्या दबावाखाली मलिकांना वाचवलं जातंय?”

दरम्यान, सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडली. “जी शिवसेना दाऊदचं नाव घेतल्यानंतर तो मुंबईचा अपराधी असल्यामुळे आक्रमक होत होती, आज थेट खरेदीची कागदपत्र उपलब्ध आहेत, दाऊदशी कादगोपत्री थेट संबंध दिसतोय, या सगळ्या गोष्टी असताना त्यांना मुख्यमंत्री पाठिशी का घालत आहेत? कुणाचा दबाव आहे? हे मुंबईचे, या देशाचे अपराधी आहेत”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

“हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हे सरकार त्या मंत्र्याच्या पाठिशी उभं राहात असेल, तर हे दाऊद शरण सरकार आहे असंच म्हणावं लागेल. संजय राठोड जेलमध्ये गेले नसतानाही तुम्ही नैतिकतेच्या आधारावर त्यांचा राजीनामा घेतला. इथे तर नवाब मलिक जेलमध्ये असून त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. तरी त्यांना वाचवण्याचं कारण काय? कुणाच्या दबावाखाली नवाब मलिकांना वाचवलं जात आहे, हे प्रश्न आम्ही विचारणार आहोत. सरकार पळ काढतंय. पण कोणत्याही परिस्थितीत नवाब मलिक यांचा राजीनामा झालाच पाहिजे”, असं देखील देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले.