राज्यात वर्षभरापूर्वी घडलेल्या राजकीय महानाट्याच्या चर्चा अजूनही चर्चेत असतात. मग ते एकनाथ शिंदेंच्या बंडापासून ते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद सोडून उपमुख्यमंत्रीपदी बसण्यापर्यंत असो. या सर्व मुद्द्यांवरून आजतागायत अनेक तर्त-वितर्क लढवले जातात. त्यावरून दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोपांचं राजकारणही रंगताना पाहायला मिळतं. त्या काळात घडलेल्या इतर महत्त्वाच्या घडामोडींप्रमाणेच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद सोडून उपमुख्यमंत्रीपदी बसणं या निर्णयामुळे अवघ्या राज्याच्याच भुवया उंचावल्या आहेत. तेव्हा नेमकं काय घडलं होतं? याबाबत आता खुद्द देवेंद्र फडणवीसांनी खुलासा केला आहे.

काय घडलं वर्षभरापूर्वी?

राज्यात एकनाथ शिंदेंचं बंड यशस्वी ठरल्यानंतर उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचीच चर्चा सगळीकडे ऐकायला मिळत होती. यासंदर्भात फडणवीसांनीच राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावाही केला होता. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती देण्यासाठी जाहीर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी तर एकनाथ शिंदेंची उपमुख्यमंत्रीपदी घोषणा होणार असल्याचंही ठामपणे सांगितलं जात होतं. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत वेगळीच घोषणा केली आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Devendra Fadnavis on Vote Jihad
Devendra Fadnavis : “महायुतीसमोरची एकमेव समस्या म्हणजे ‘व्होट जिहाद’ कारण..”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
ajit pawar on cm post
अजित पवार म्हणाले, “धरसोड केली तर तुमची विश्वासार्हता राहात नाही”; मुख्यमंत्रीपदाबाबतही तडजोडीची तयारी!

स्वत: मुख्यमंत्रीपदी बसण्याऐवजी देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंचीच मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली, तसेच आपण कोणतंही सत्तेचं पद घेणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं. यामुळे तर्क-वितर्कांना अजूनच उधाण आलं. फडणवीसांवर प्रचंड दबाव असल्याचं बोललं जात होतं. काही वेळातच फडणवीसांनी दुसरी घोषणा केली. यानुसार, ते स्वत: राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी बसणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे पुन्हा चर्चेला सुरुवात झाली. या सर्व प्रकरणावर रिपब्लिक टीव्हीवर बोलताना फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

“…तर तेव्हा चपराशीही झालो असतो”

“मी का झालो? भाजपानं बनवलं म्हणून. माझं अस्तित्वच भाजपामुळे आहे. भाजपा हटली, तर माझं काहीच अस्तित्व नाहीये. त्यामुळे माझा पक्ष मला जे सांगेल, ते मी करेन. माझ्या पक्षानं तर उपमुख्यमंत्री करून माझा सन्मान केला. त्यांनी मला चपराशी बनायला सांगितलं असतं तरी मी झालो असतो”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

“…अन् एकनाथ शिंदेंनी दुसऱ्याच दिवशी चूक मान्य केली”, ‘त्या’ घटनेबाबत देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा

“मी म्हणालो होतो की मला सरकारमध्ये कोणतंही पद नकोय. मी पक्षाला सांगितलं होतं, यानं असा संदेश जाईल की मी पदासाठी इतका लोभी झालोय की मुख्यमंत्री होतो, उपमुख्यमंत्री झालो. त्यामुळे मला पक्षसंघटनेतलं काम द्या. तसंच ठरलं होतं. पण नंतर आमच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली. त्यांना असं वाटलं की आघाडी सरकार आहे. याला चालवायला हवं. त्यासाठी कुणीतरी अनुभवी तिथे असायला हवं. त्यामुळे त्यांनी मला आदेश दिला. पण उपमुख्यमंत्रीपदी बसायचंय हा माझ्यासाठी धक्का होता”, असं फडणवीसांनी सांगितलं.

“पवारांनी आमचा वापर केला, रणनीती आखली अन्…”, पहाटेच्या शपथविधीआधी घडलेल्या ‘डबल गेम’बाबत फडणवीसांचा मोठा खुलासा

“तो निर्णय योग्यच होता”

उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय धक्कादायक का होता, यावर फडणवीसांनी यावेळी भाष्य केलं आहे. “त्यावेळी माझी मनस्थिती पक्ष चालवण्याची झाली होती. मग अचानक मला उपमुख्यमंत्री बनायला सांगितलं गेलं. आज जर तुम्ही मला विचाराल, तर मी म्हणेन आमच्या नेत्यांचा निर्णय योग्यच होता. कारण आज मी तिथे आहे, म्हणून आमच्या पक्षाचा अजेंडा व्यवस्थित चालवतोय. आमच्या पक्षाला सांभाळतोय. आमच्या सरकारला माझ्या अनुभवाचा फायदा मिळतो. त्यामुळे त्या वेळी घेतलेला निर्णय योग्यच होता”, असंही फडणवीसांनी यावेळी नमूद केलं.