Devendra Fadnavis on Home Ministry: महाराष्ट्रात सध्या मंत्रीमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. आधी एकनाथ शिंदेंनी अगदी शपथविधीच्या दोन तास आधी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला तयार असल्याचं मान्य केलं. त्यानंतर आता दिल्लीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकाच वेळी उपस्थित असताना एकनाथ शिंदे मात्र महाराष्ट्रातच आहेत. अजित पवारांनी शरद पवारांची तर देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण येऊ लागलं आहे. या सर्व चर्चांवर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

दिल्लीत भेटीगाठी, मोदींचा कानमंत्र!

देवेंद्र फडणवीसांनी राजधानी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या प्रमुख नेत्यांशी झालेल्या भेटीचा तपशील सांगितला. “एक पद्धत आहे की जेव्हा आपण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो, त्यानंतर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सभापती यांची भेट घ्यायची असते. त्यानुसार मी त्यांची भेट घेतली आहे. आज सकाळी पंतप्रधानांशी माझी प्रदीर्घ चर्चा झाली. त्यात मी त्यांचे आशीर्वादही घेतले. त्यावेळी महाराष्ट्रासंदर्भात आमची काही चर्चाही झाली आहे. पंतप्रधानांनी मला सांगितलं आहे की महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. या राज्याला गतीशील ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान महाराष्ट्राला पूर्ण सहकार्य द्यायला तयार आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
CM Devendra Fadnavis IMP Statement About Ladki Bahin Scheme
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य, “२१०० रुपये…”
bjp devendra fadnavis loksatta
“देवेंद्रजींची मनिषा आम्ही पूर्ण केली, आज त्यांनी आमची…”, कोण म्हणतय असं?
Sanjay Shirsat On grand alliance government Mahayuti Politics
Sanjay Shirsat : शिवसेनेला किती मंत्रि‍पदे मिळणार? शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “उपमुख्यमंत्रिपद अन्…”
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात असणार का? प्रश्न विचारताच म्हणाले, “आज संध्याकाळपर्यंत…”
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
“पंतप्रधानांसह ९ केंद्रीय मंत्री, १९ राज्याचे मुख्यमंत्री, लाडक्या बहि‍णींसह…”; शपथविधी सोहळ्याला कोण-कोण असणार? भाजपा नेत्याने सांगितली यादी
Vijay Shivtare
Vijay Shivtare : Video : “तुम्हाला माजी मंत्री, आमदार ओळखता येत नाही का?”, पोलिसांनी गाडी अडवल्याने विजय शिवतारे संतापले; नेमकं काय घडलं?

Ajit Pawar Sharad Pawar Meet: अजित पवारांची प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवारांशी भेट; कशावर झाली चर्चा? उत्तरादाखल म्हणाले, “मंत्रीमंडळ विस्तार…”

“मी काल पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह अशा पक्षाच्या प्रमुख लोकांची सदिच्छा भेट घेतली आहे. रात्री जे. पी. नड्डा, अमित शाह आणि बी. एल. संतोष यांच्याशी मंत्रीमंडळाबाबत चर्चा केली”, अशीही माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

फडणवीस-पवार दिल्लीत असताना शिंदे का नाहीत?

दरम्यान, एकाच वेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत असताना एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत का नाहीत? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी यावेळी भूमिका स्पष्ट केली. “मंत्रीमंडळाच्या विस्ताराचा कोणताही तिढा नाहीये. अजित पवार त्यांच्या कामानिमित्त दिल्लीत आले आहेत. मी माझ्या कामानिमित्त आलो आहे. एकनाथ शिंदेंचं लगेच इथे काही काम नसल्यामुळे आलेले नाहीत. त्यामुळे ते मुंबईत आहेत, आम्ही दिल्लीत आहोत अशा चर्चांमध्ये अर्थ नाही. कालपासून माझी आणि अजित पवारांची दिल्लीत भेट झालेली नाही. मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायला आलो आहे”, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

“आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय आमचं संसदीय मंडळ, नेते घेतात. काल चंद्रशेखर बावनकुळे आणि मी आमच्या नेत्यांची भेट घेतली. मंत्रीपदांबाबत चर्चाही केली आहे. प्रत्येक विभागातून कोण मंत्रीपदाचे उमेदवार असू शकतात, कुणाला आपण बनवू शकतो अशी एक यादी आम्ही तयार केली आहे. आता वरीष्ठ स्तरावर ते निर्णय घेतील आणि आम्हाला कळवतील. मंत्रीपद वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय. तुम्हाला लवकरच कळेल”, असं सूचक विधान फडणवीसांनी केलं आहे.

गृहखात्याचं काय होणार?

दरम्यान, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना एकनाथ शिंदे यांच्याकडून गृहखात्याचा आग्रह धरण्यात आल्याचं बोललं जात आहे. अजूनही शिंदे गट गृहखात्यासाठी आग्रही असल्याची भूमिका मांडली जात आहे. या पार्श्वभूमीवर गृहखातं नेमकं कुणाकडे जाणार? याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झालेली असताना देवेंद्र फडणवीसांनी मात्र यावर बोलणं टाळलं आहे. पत्रकारांनी याबाबत विचारणा केली असता “अरे बाबा थोडी वाट पाहा ना, एवढी घाई काय आहे. सगळं सांगतो”, असं ते म्हणाले.

Story img Loader