Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana Criteria: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागताच राज्यात नवे मुख्यमंत्री, मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटपाची जोरदार चर्चा सुरू झाली. इच्छुक, नाराजांच्या मागण्या-व्यथा चर्चेत आल्या. मात्र, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या असंख्य महिलांच्या दृष्टीने उत्सुकतेचा व चिंतेचा असलेला लाडकी बहीण योजनेचा मुद्दाही चर्चेत आला. निकालांनंतर आता लाडकी बहीण योजनेत बदल होणार किंवा त्याचे निकष बदलणार असं बोललं जाऊ लागलं. महायुतीनं आश्वासन दिलेली १५०० वरून २१०० रुपयांची वाढही लांबणार असल्याचं सांगितलं जाऊ लागलं. त्यामुळे यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत निवेदन सादर केलं आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षांनी केलेल्या भाषणांचा, मांडलेल्या मुद्द्यांचा आणि केलेल्या आरोपांचा आढावा घेतला. त्यावर उत्तरं दिलं. त्याचदरम्यान लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेण्यात येत असलेले आक्षेप व शंकांबाबत त्यांनी भाष्य केलं.

devendra fadnavis ajit pawar eknath shinde (3)
Devendra Fadnavis Video: गृहखातं पुन्हा तुमच्याकडेच येणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अरे बाबा…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर आता फडणवीसांची पुढील योजना काय?; म्हणाले, “माझा भर हा…”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर कोणकोणती आव्हानं? (फोटो सौजन्य पीटीआय)
देवेंद्र फडणवीसांना घवघवीत यश मिळालं खरं, पण आता कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार?
CM Devendra Fadnavis IMP Statement About Ladki Bahin Scheme
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य, “२१०० रुपये…”
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पहिल्या पत्रकार परिषदेतलं वक्तव्य, “आमच्या भूमिका बदलल्या आहेत पण..”

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात महायुतीला मिळालेल्या मोठ्या विजयासाठी मतदारांचे, लाडक्या बहि‍णींचे, मित्रपक्षांचे, कार्यकर्त्यांचे आभार मानले. “नवीन सरकार आल्यानंतर विधानसभेतलं हे माझं पहिलं भाषण आहे. म्हणून मी या विधानसभेतील सर्व सदस्यांचं आणि महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेचे आभार मानतो. त्यांनी आमच्या महायुतीला घवघवीत यश दिलं. २३७ आमदार सत्तापक्षाच्या बाजूने निवडून आले”, असं ते म्हणाले. तसेच, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या ‘एक है, तो सेफ है’ या घोषणेला हा विजय म्हणजे जनतेनं दिलेला प्रतिसाद आहे”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“लाडकी बहीण योजनेबाबत शंका ठेवू नका”

दरम्यान, लाडकी बहीण योजनेबाबत उपस्थित करण्यात येणाऱ्या शंका मुख्यमंत्र्यांनी यावेळी फेटाळून लावल्या. “आज या सभागृहाला मी आश्वस्त करू इच्छितो की कोणतीही शंका मनात ठेवू नका. जी आश्वासनं आम्ही दिली आहेत, ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत, त्यातली एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहि‍णींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबरचा हफ्ता त्यांच्या खात्यात आम्ही जमा करत आहोत. काहीच बदल नाहीये”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

इथे पाहा विधानसभेचं आजचं कामकाज

“नाना (नाना पटोले), मी स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजनेसाठी कोणतेही नवे निकष नाहीत. आता तर सगळ्यांच्याच खात्यात आम्ही पैसे टाकत आहोत. पण प्रथमदर्शनी लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत. जसं समाजात काही चांगल्या प्रवृत्ती असतात, तशाच काही वाईट प्रवृत्तीही असतात. एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कुणी वापरत असेल, तर तो जनतेचा पैसा योग्य प्रकारे वापरला गेला पाहिजे ही तुमची आमची सगळ्यांचीच जबाबदारी आहे. कारण आम्हाला मागे कळलं की माणसानंच ९ खाती उघडली. त्यामुळे त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं? बरं लाडका भाऊही म्हणू शकत नाही. बहि‍णींच्या पैशांवर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा?” अशा शब्दांत योजनेचा गैरवापर करणाऱ्यांनाही देवेंद्र फडणवीसांनी सूचक इशारा यावेळी दिला.

Devendra Fadnavis: Video: “अजितदादा, तुम्ही नक्की एक दिवस…”, देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत मिश्किल टिप्पणी, सभागृहात पिकला हशा!

“शेतकरी, युवक, ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आम्ही जी काही आश्वासनं दिली असतील, ती आम्ही पूर्ण करणार आहोत”, असंही त्यांनी नमूद केलं.

Story img Loader