Devendra Fadnavis : महायुतीला विधानसभा निवडणुकांच्या निकालात स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीकडून मुख्यमंत्री कोण? यावर गेले अनेक दिवस खलबतं सुरू होती. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याचं उत्तर अवघ्या महाराष्ट्राला मिळालं आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीसच आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत, हे स्पष्ट झालं आहे. आज झालेल्या भाजपा कोअर कमिटी बैठक आणि भाजप विधीमंडळ पक्ष बैठकीत भाजपच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी जे भाषण केलं त्यात २०१९ बाबत महत्त्वाचा उल्लेख केला.

५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी

५ डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर दिमाखदार शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadnavis ) विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये आपलं पहिलं भाषण केलं. या भाषणात त्यांनी त्यांच्यासोबत महायुतीच्या गेल्या सरकारमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार मानले.

Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman : महाराष्ट्रातील निवडणुकीच्या निकालाचं निर्मला सीतारमण यांनाही आश्चर्य; म्हणाल्या, “इथल्या जनतेने…”
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
New CM of Maharashtra Devendra Fadnavis| BJP announced Maharashtra New Chief Minister
Devendra Fadnavis : मुख्यमंत्रि‍पदाचा मार्ग मोकळा होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एक है तो सेफ है…”
Eknath Shinde News
Eknath Shinde : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? उदय सामंत यांनी दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांनी…”
Devendra Fadnavis
Maharashtra Government Formation Updates : देवेंद्र फडणवीसांची एकनाथ शिंदेंना मंत्रीमंडळात राहण्याची विनंती; कोणतं खातं स्वीकारणार?
New CM of Maharashtra Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Maharashtra New CM: “चार गोष्टी मनाविरुद्ध होतील, पण…”, सत्तास्थापनेआधी महायुतीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
political journey Devendra Fadnavis, Mayor, Chief Minister
फडणवीसांचा थक्क करणारा राजकीय प्रवास, महापौर ते मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री

२०१९ ला आपल्याला बहुमत मिळालं होतं पण..

देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले, २०१९ ला आपल्याला जनतेचा कौल मिळाला होता. दुर्दैवाने जनतेचा कौल हिसकावून घेण्यात आला आणि जनतेशी बेईमानी झाली. मी त्या इतिहासात जात नाही एक नवीन सुरुवात आपण करतो आहे. पण या गोष्टीचा निश्चित उल्लेख करेन की २०१९ च्या अडीच वर्षांत आपल्याला, आपल्या आमदारांना, नेत्यांना त्रास देण्यात आला. तरीही कुणीही आपल्याला सोडून गेलं नाही.

हे पण वाचा- Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस विदर्भातील पाचवे, नागपुरातील दुसरे मुख्यमंत्री

भाजपाचा एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही -फडणवीस

२०१९ ते २०२२ या अडीच वर्षांच्या काळात एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही. सगळे आमदार, सगळे नेते संघर्ष करत होते. त्यानंतर २०२२ मध्ये आपलं सरकार आलं. त्यानंतर आता पूर्ण बहुमत मिळालं. महायुतीला २३० हून जास्त जागा मिळाल्या. हा इतिहास अभूतपूर्व असा आहे. मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानेन. बूथ कार्यकर्ता म्हणून ज्याने सुरुवात केली अशा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोदींनी संधी दिली. हा पक्ष नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मोठा झाला आणि आपल्याला काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे मी आदरणीय मोदी यांचे आभार मानतो. तसंच पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही आभार मानतो असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.

अमित शाह यांचेही विशेष आभार मानतो-फडणवीस

महाराष्ट्रात आपल्याबरोबर, कार्यकर्त्यांबरोबर राहून ज्यांनी आपल्याला ताकद दिली ते देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे, तसंच भाजपाच्या सगळ्याच नेत्यांचे मी मनापासून आभार मानतो. राज्यातले कार्यकर्ते आणि नेते यांनी आपल्याला जी मदत केली त्यांचेही मी आभार मानतो. महाराष्ट्र भाजपा पूर्ण ताकदीने मैदानात उतरला होता. महाराष्ट्रातल्या भाजपाच्या सगळ्या टीमचं मी अभिनंदन करतो. तुम्ही सगळे आहात म्हणून मी इथे आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुढची वाट ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघर्षाची आहे. आपलं महायुतीचं सरकार आहे. एकदिलाने सगळ्या मित्रांना बरोबर घेऊन पुढे जायचं आहे. सगळ्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करता येत नाहीत. आपण एक मोठं लक्ष्य घेऊन या ठिकाणी आलो आहोत. येत्या काळात चार गोष्टी मनासारख्या झाल्या तर चार गोष्टी मनाविरुद्धही होतील तरीही आपण संपूर्ण शक्तीने काम करु असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Story img Loader