Devendra Fadnavis : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. डिसेंबर महिन्यातली ही घटना घडून दोन महिने पूर्ण होण्यास आले आहेत. दरम्यान भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी हा प्रश्न लावून धरला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. तसंच दोनदा या सगळ्या प्रकरणात अजित पवारांची भेट घेतली होती. दरम्यान बीडच्या आष्टीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांचा विशेष उल्लेख केला. सुरेश धस यांना त्यांनी आधुनिक भगीरथाची उपमा दिली. तसंच एकदा सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात असंही मुख्यमंत्री म्हणाले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“मराठवाड्याला कृष्णा खोरेचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी गोपीनाथ मुंडे आणि मराठवाड्याततील अनेक नेत्यांनी केला. पण दुर्दैवाने ते सगळे काम पूर्ण झाले नाही. २३ टीएमसी पाण्यापैकी केवळ सात टीएमसी पाणी सापडले. या भागाचा दुष्काळ आता भूतकाळ होणार आहे. जो पर्यंत पश्चिमी वाहिन्यांचे पाणी, थेट समुद्रात जाणारे पाणी गोदावरीमध्ये आणीत नाहीत तोपर्यंत मराठवाडा दुष्काळ मुक्त होणार नाही. त्यासाठी गोदावरीच्या एकात्मिक आराखडा बनवला आहे. त्या माध्यमातून ५३ टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आले पाहिजे.” “मी माझे भाग्य समजतो पुन्हा माझ्यावर जलसिंचनची जबाबदारी आली. या प्रकल्पाचे सगळे अडथळे दूर केले. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच सुरेश धस यांचा उल्लेख आधुनिक भगीरथ असा केला.

PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
What Pankaja Munde Said?
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य; “राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, काही लोक सुपारी…”
marathi Vishwa sammelan Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: “मराठी माणूस कलहशील, त्याला…”, मी पुन्हा येईनची री ओढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खुमासदार भाषण
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये

सुरेश धस म्हणजे आधुनिक भगीरथ-फडणवीस

देवेंद्र फडणवीस सुरेश धस यांच्याबाबत म्हणाले, “सुरेश धस हे आधुनिक भगीरथ असून ते एकदा मागे लागले तर डोकं खाऊन टाकतात.” असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. “महायुतीचं सरकार असताना त्यांनी मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मेहनत घेतली” असं सांगत फडणवीसांनी सुरेश धस यांचे कौतुक केलं.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आष्टी येथील कुंटेफळ साठवण तलावाचे भूमिपूजन करण्यात आलं. त्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. या तलावामुळे दुष्काळी आष्टी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

आमदार सुरेश धस देवेंद्र फडणवीसांना म्हणाले देवेंद्र बाहुबली

आमदार सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख देवेंद्र बाहुबली असा केला. आमदार सुरेश धस यांच्याकडून भरसभेत फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. बाकी कोणाकडून अपेक्षा नाही, पण देवेंद्र फडणवीसांकडून अपेक्षा आहे असं सुरेश धस म्हणाले. दरम्यान संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात सगळ्यांवर कारवाई होणार. या ठिकाणी सगळ्यांना गुण्या गोविंदाने राहायचे आहे. आपण नवीन बीड तयार करू असंही देवेंद्र फडणवीस त्यांच्या भाषणात म्हणाले.

Story img Loader