आज ‘इंडिया टुडे’ने उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, यावेळी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचे उमेदावर कोण असेल? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता, त्यांनी याबाबत मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंचा बदला घेतला, कारण…”, देवेंद्र फडणवीसांचं सत्तास्थापनेबाबत मोठं विधान

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचे उमेदवार कोण असेल? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता, त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “मी यापूर्वी सांगितलं आहे की, येणाऱ्या निवडणुका आम्ही एकनाथ शिंदेंच्या पक्षाबरोबर युतीमध्ये लढणार आहोत. मुख्यमंत्री कोण होईल, त्यापेक्षा आमच्याकडे एकच हुकूमचा एक्का आहे, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यामुळे कोणीही मुख्यमंत्री असो महाराष्ट्राचा विकास होत राहिल. आज आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि जेव्हा आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ तेव्हाही आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असतील. बाकी २०२४ मध्ये मुख्यमंत्री कोण होईल हा निर्णय, पक्षातील वरिष्ठ घेतील”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा – एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा मूळ प्रस्ताव कुणी दिला? फडणवीसांनी दिलेलं उत्तर ऐकून बसेल धक्का

“…म्हणून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय”

“आम्हाला सत्ता हवी म्हणून आम्ही सत्तापरिवर्तन केले नाही, तर गेल्या अडीच वर्षात राज्यात ज्या प्रकारे घटना घडल्या होत्या. त्यामुळे आम्ही सत्तापरिवर्तन केले. मात्र, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्रीपदी राहता आणि त्यानंतर दुसऱ्या सरकारमध्ये सहभागी होता, तेव्हा तुम्ही सत्तेसाठी हपापलेले आहात, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे मी सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, असा निर्णय घेतल्यानंतर मला वरिष्ठांनी सांगितले की, तुम्ही यापूर्वी मुख्यमंत्रीही राहिले आहात. त्यामुळे आम्हाला सरकार चालवण्यासाठी तुमच्या अनुभवाची आवश्यकता आहे. म्हणून मी सरकारमध्ये सहभागी होणाचा निर्णय घेतला”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “मी सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता, मात्र…”; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण

“तो प्रस्ताव मीच दिला होता”

“एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय माझ्या सहमतीने झाला. यापुढे जाऊन मी असं म्हणेन की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच होता. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर मी जबाबदारीने हे वक्तव्य करतोय. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं, हा माझा प्रस्ताव होता. या प्रस्तावानंतर आमच्या वरिष्ठ नेत्यांनी याला मान्यता दिली”, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis statement on 2024 election and chief minister spb