लातूर- औद्योगिक वसाहतीच्या हद्दीतील उद्योजकांनी महापालिकेच्या मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी महापालिकेने नोटीसा बजावल्या मात्र वसुलीसाठी पालिकेच्या पथकाला थेट मुख्यमंत्र्याचा फोन आल्याने आलेले वसुली पथक परतले आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या संबंधात बैठक घेऊन तोडगा निघाल्यानंतरच वसुलीचा प्रश्न निकाली निघणार आहे. लातूर महापालिकेच्या हद्दीत जुनी एमआयडीसी आहे या एमआयडीसीला सुविधा देण्याचे काम महापालिका करतेत्या पोटी सेवा कर म्हणून उद्योजकाकडून मालमत्ता कराच्या रूपाने कर वसूल करण्यात येतो.
लातूर महापालिकेने लावलेल्या मालमत्ता कराला उद्योजकांचा विरोध आहे दर चौरस फूट जागेला नऊ रुपये दराने कर आकारणी करण्यात आली आहे. लातूर एमआयडीसी ही ड वर्गात येते त्यामुळे मालमत्ता कर कमी असावा अशी उद्योजकांची मागणी आहे .मालमत्ता करा संबंधी महापालिकेने पाठपुरावा केल्यानंतर उद्योजकांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून महापालिकेचा कर उद्योजकांची पिळवणूक करणार असल्याचे सांगितले त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट पालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना फोन केला व मुंबई येथे बैठक घेऊन तोडगा निघेपर्यंत वसुली थांबवावी असे सांगितले.
लातूर एमआयडीसी कडे महापालिकेची २० कोटी पेक्षा जास्त मालमत्ता कर थकीत आहे यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. मूलभूत सुविधांसह विकास कामालाही पालिकेकडे पैसे नाहीत त्यामुळे पालिकेने वसुलीसाठी पथक पाठवले होते .आता मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक झाल्यावरच या संबंधित तोडगा निघणार आहे