केंद्रीय पातळीवर स्वतंत्र सहकार मंत्रालय तयार केल्यानंतर त्याचा पदभार अमित शाह यांच्याकडे देण्यात आल्यानंतर त्यावरून बऱ्याच राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या. महाराष्ट्रातील सहकारी चळवळ नियंत्रित करण्यासाठी आणि त्यातून राज्यातील सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी ही चाल खेळली गेल्याचं बोललं गेलं. मात्र, हे सर्व दावे भाजपाकडून फेटाळून लावण्यात आले. त्यानंतर या मुद्द्यावरून पुन्हा एकजा राजकीय आरोपांचा धुरळा अहमदनगरमधील सहकार परिषदेत दिसून आला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सहकार चळवळीवरून खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

अमित शाहांच्या उपस्थितीतच देवेंद्र फडणवीसांनी स्टेजवरून टोलेबाजी केली. “देशात नरेंद्र मोदींचं आणि महाराष्ट्रात आमचं सरकार आलं, तेव्हा लोक म्हणायचे की यांना सहकारमधलं काय कळतं? आता सहकारचं काय होणार? पण आमच्या सरकराने सहकारबाबत घेतलेले निर्णय सहकारला अडचणीतून बाहेर काढणारे ठरले”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

PM Narendra Modi Speech
JKF’S Forgotten Crisis हे पुस्तक विरोधकांनी वाचावं, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी का दिला? नेहरुंबाबत काय दावे आहेत?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Devendra Fadnavis
Maharashtra News Updates : आष्टीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार भाषण, सुरेश धस यांना दिली भगीरथाची उपमा
PM Narendra Modi Speech
Narendra Modi : ४० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना कसं लक्ष्य केलं?
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
Draupadi Murmu and sonia gandhi
Sonia Gandhi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या भाषणावर सोनिया गांधींची टीका, म्हणाल्या, “भाषण करताना…”
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये

“माझा त्यांना सल्ला आहे की…”

दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर देखील अप्रत्यक्ष शब्दांमध्ये निशाणा साधला. “अनेक लोक सहकारी चळवळ धोक्यात आहे असं सांगतात. पण असे लोकच खासगी कारखाने काढून बसले आहेत आणि ते खासगी कारखान्यांचे मालक आहेत. सहकाराचे कारखाने खासगीत त्यांनी नेले आहेत आणि आता तेच शिकवतायत की सहकार चळवळ देखील अडचणीत आहे”, असं फडणवीस म्हणाले. “माझा त्यांना सल्ला आहे की जर सहकार चळवळ अडचणीत आहे, तर तुम्ही त्या चळवळीला मदत करा”, असं देखील त्यांनी नमूद केलं.

अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “देशात पहिल्यांदाच..!”

दरम्यान, “कारखान्यांना मदत करण्याऐवजी ते कारखाने खासगीमध्ये कवडीमोलाच्या भावाने विकत घ्यायचे आणि त्याच कारखान्याच्या जमिनी कोट्यवधींना विकायच्या किंवा गहाण टाकायच्या आणि त्यातून पुन्हा कारखाने उभे करायचे हे शेतकऱ्यांच्या कारखान्यांना खासगी लोकांच्या घशात टाकण्याचं षडयंत्र चाललेलं आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि सहकार जगला पाहिजे”, असं ते म्हणाले.

“काळजीचं कारण नाही”

“काळजीचं कारण नाही. ७५ वर्षांनंतर का होईना, देशाच्या सरकारला हे लक्षात आलं की सहकार हाच उद्धाराचा कारक असू शकतो, म्हणून ७५ वर्षांनंतर देशात एक वेगळं सहकार मंत्रालय तयार झालं आणि देशातले सगळ्यात दमदार मंत्री अमित शाह यांच्याकडे ते गेलं. त्यामुळे आता सहकाराला मागे वळून पाहाण्याची आवश्यकता नाही”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी अमित शाह यांची स्तुती केली.

Story img Loader