शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत तुफान फटकेबाजी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा दिसला की ‘सिंहासन’ सिनेमा आठवतो. पण, आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडली नाही, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पूर्वीच्या काळी नाट्यसंमेलनात राजकीय नेत्यांना बोलावण्यावरून खूप वाद व्हायचे. वृत्तपत्रांमध्ये मथळेच्या मथळे छापण्यात येत होते. पण, अलीकडे हे कमी झालंय, कारण तुम्ही आम्हाला आपल्यातील एक समजता. तुमचा ठाम विश्वास झालाय की, हे नाटक करतातच. त्यामुळे राजकीय नेत्यांना नाट्य संमेलनात बोलावलं पाहिजे.”
“मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटून गेलं की, किती प्रश्न सुटतील”
“प्रशांत दामले शनिवारी म्हणाले, ‘अध्यक्ष झाल्यावर मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटलं.’ ही कला आमच्या राजकारणातील काही लोकांना दामलेंनी शिकवावी. मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटून गेलं की, किती प्रश्न सुटतील. पण, तुम्ही असे मुख्यमंत्री आहात, जे जनतेला हसवतात, रडवतात आणि संवेदनशिलतेसाठी तुमचं कार्य महत्वाचं आहे,” असं कौतुक फडणवीसांनी केलं.
“मानवी संवेदना ‘एआय’ कधीच देऊ शकणार नाही”
“कितीही आर्टिफिशियल इंटेलिजेंस ( एआय ) आलं तरी कला, साहित्य, संस्कृती, नाट्य आणि गीत यावर काहीही परिणाम होणार नाही. कदाचित एखादं वाहक म्हणून ‘एआय’चा वापर करू. पण, मानवी संवेदना ‘एआय’ कधीच देऊ शकणार नाही,” असंही फडणवीसांनी सांगितलं.
“आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज नाही”
“आम्हाला परिस्थितीनुसार नाटक किंवा सिनेमाचं अनुसरण होतं. जसं मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा दिसला की ‘सिंहासन’ सिनेमा आठवतो. आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही. मी कुणाबद्दल बोलतोय, हे सांगण्याची आवश्यकता देखील नाही,” असा अप्रत्यक्षपणे खोचक टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
“ज्यांनी केवळ नाटकं केली, त्यांना लोक घरी बसवतात”
“आपल्याकडे तिसरी घंटा वाजली की नाटक सुरू होते. आमच्याकडे आचारसंहितेची तिसरी घंटा वाजली की आम्ही तयारीला लागतो. पण, चांगल्या तालमी केल्या की प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळतो, तसा आम्हालाही मिळतो. ज्यांनी केवळ नाटकं केली, त्यांना लोक घरी बसवतात. २०१९ साली ‘कट्यार पाठीत घुसली’, हा प्रयोग झाला. मग २०२२ साली आम्ही प्रयोग केला, ‘आता होती गेली कुठे?’ त्यामुळे अशाप्रकारचे प्रयोग चालूच असतात,” असंही फडणवीस म्हणाले.