राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या ‘भूमिपुत्र’ या स्मृतीग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात त्यांचा बाळासाहेब ठाकरेंसोबतचा एक किस्सा सांगितला. “एका लोकसभेत अकोला मतदारसंघ निवडून येईल न येईल म्हणून शिवसेनेला गेला आणि दोन्हीही पक्षांना निवडून येण्याची आशा नव्हती. मात्र भाऊसाहेब फुंडकरांनी बाळासाहेब ठाकरेंशी बोलून तो मतदारसंघ घेतला आणि निवडून आले,” अशी आठवण फडणवीसांनी सांगितली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लोकसभेची निवडणूक होती तेव्हा अकोला मतदारसंघ निवडून येईल न येईल म्हणून तो शिवसेनेला गेला होता. दोन्हीही पक्षांना फार आशा नव्हती. मात्र, भाऊसाहेब फुंडकर यांनी स्वतः निर्णय घेतला की नाही, आम्ही हा मतदारसंघ जिंकू शकतो. ते प्रमोद महाजन यांच्याशी बोलले. ते म्हणाले आपण अकोला मतदारसंघ शिवसेनेला दिलाय, पण मी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बोलतो.”

Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Ajit Pawar On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “मास्टरमाईंड कोणी असो, त्याला सोडणार नाही”, अजित पवारांचं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना आश्वासन
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
Milind Gawali
“१२ वीमध्ये मी मराठी विषयामध्ये नापास झालो”; मिलिंद गवळी म्हणाले, “मी वर्गात जाताना…”

“या व्यक्तीत ‘स्पार्क’ हे बाळासाहेब ठाकरेंच्याही लक्षात आलं”

“भाऊसाहेब फुंडकर बाळासाहेब ठाकरेंना जाऊन भेटले. या व्यक्तीत ‘स्पार्क’ आहे आणि ते जे सांगत आहे त्यात तथ्य आहे हे बाळासाहेब ठाकरेंच्याही लक्षात आलं. हा मतदारसंघ निवडून येऊ शकतो. यानंतर भाऊसाहेबांनी या मतदारसंघाची नव्याने मांडणी केली. तिथले राजकीय गणितं बसवले आणि ते निवडून आले. त्यांनी लोकसभेत नवी सुरुवात केली,” असं फडणवीसांनी सांगितलं.

हेही वाचा : राज्यातील शिक्षक भरती घोटाळा ‘व्यापम’सारखाच; नाना पटोलेंचे फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

“माझ्याविरोधात पत्रकं जरूर वाट, पण त्याचं बिल तू देऊ नको, मला पाठव”

“भाऊसाहेबांचा स्वभाव कसा होता, तर एका कार्यकर्त्याने नाराज होऊन त्यांच्याविरोधात पत्रकं छापली आणि स्वतः वाटायचा. भाऊसाहेब त्याच्या घरी गेले आणि वहिनी चहा करा म्हणून सांगितलं. चहा प्यायले आणि म्हणाले बाबा तुझी काही नाराजी असेल, पण तुझ्याकडे पत्रकं छापण्याचे पैसेही नाहीत. तुझी परिस्थिती हालाखीची आहे. तू पत्रकं जरूर वाट, पण त्याचं बिल तू देऊ नको, ते बिल मला पाठव, मी भरतो. निवडणूक झाली की मग काय करायचं ते आपण पाहू,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.

Story img Loader