राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या राजकीय जीवनावर बोलताना त्यांच्या स्वभावाची ओळख करून देणारा एक किस्सा सांगितला. “भाऊसाहेबांच्या एका नाराज कार्यकर्त्याने त्यांच्याविरोधात पत्रकं झापली. तेव्हा त्यांनी कार्यकर्त्याच्या घरी जाऊन तू पत्रकं जरूर वाट, पण त्याचं बिल तू देऊ नको. ते बिल मला पाठव, मी भरतो,” असं सांगितल्याची आठवण फडणवीसांनी सांगितली. ते गुरुवारी (२५ ऑगस्ट) भाऊसाहेब फुंडकर यांच्या ‘भूमिपुत्र’ या स्मृतीग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाऊसाहेबांचा स्वभाव कसा होता, तर एका कार्यकर्त्याने नाराज होऊन त्यांच्याविरोधात पत्रकं छापली आणि स्वतः वाटायचा. भाऊसाहेब त्याच्या घरी गेले आणि वहिनी चहा करा म्हणून सांगितलं. चहा प्यायले आणि म्हणाले बाबा तुझी काही नाराजी असेल, पण तुझ्याकडे पत्रकं छापण्याचे पैसेही नाहीत.”

“बिल तू देऊ नको, ते बिल मला पाठव”

“तुझी परिस्थिती हालाखीची आहे. तू पत्रकं जरूर वाट, पण त्याचं बिल तू देऊ नको, ते बिल मला पाठव, मी भरतो. निवडणूक झाली की मग काय करायचं ते आपण पाहू,” असं फुंडकरांनी सांगितल्याचं फडणवीसांनी नमूद केलं.

“अकोला मतदारसंघ निवडून येईल न येईल म्हणून तो शिवसेनेला गेला”

देवेंद्र फडणवीस फुंडकरांची वैशिष्ट्ये सांगताना म्हणाले, “लोकसभेची निवडणूक होती तेव्हा अकोला मतदारसंघ निवडून येईल न येईल म्हणून तो शिवसेनेला गेला होता. दोन्हीही पक्षांना फार आशा नव्हती. मात्र, भाऊसाहेब फुंडकर यांनी स्वतः निर्णय घेतला की नाही, आम्ही हा मतदारसंघ जिंकू शकतो. ते प्रमोद महाजन यांच्याशी बोलले. ते म्हणाले आपण अकोला मतदारसंघ शिवसेनेला दिलाय, पण मी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बोलतो.”

हेही वाचा : राज्यातील शिक्षक भरती घोटाळा ‘व्यापम’सारखाच; नाना पटोलेंचे फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

“या व्यक्तीत ‘स्पार्क’ हे बाळासाहेब ठाकरेंच्याही लक्षात आलं”

“भाऊसाहेब फुंडकर बाळासाहेब ठाकरेंना जाऊन भेटले. या व्यक्तीत ‘स्पार्क’ आहे आणि ते जे सांगत आहे त्यात तथ्य आहे हे बाळासाहेब ठाकरेंच्याही लक्षात आलं. हा मतदारसंघ निवडून येऊ शकतो. यानंतर भाऊसाहेबांनी या मतदारसंघाची नव्याने मांडणी केली. तिथले राजकीय गणितं बसवले आणि ते निवडून आले. त्यांनी लोकसभेत नवी सुरुवात केली,” असं फडणवीसांनी सांगितलं.